Lokmat Agro >शेतशिवार > दुष्काळावर मात करत प्रयोगशील शेतीवर भर; माणदेशाचा बदलता 'क्रॉप पॅटर्न'

दुष्काळावर मात करत प्रयोगशील शेतीवर भर; माणदेशाचा बदलता 'क्रॉप पॅटर्न'

Emphasis on experimental agriculture to overcome drought; Man's Changing 'Crop Pattern' | दुष्काळावर मात करत प्रयोगशील शेतीवर भर; माणदेशाचा बदलता 'क्रॉप पॅटर्न'

दुष्काळावर मात करत प्रयोगशील शेतीवर भर; माणदेशाचा बदलता 'क्रॉप पॅटर्न'

माणदेशातील क्रॉप पॅटर्न बदलू लागला आहे. ड्रॅगन फ्रुट, द्राक्षे, डाळिंब, बोर, कलिंगड, पपई, पेरू यासारख्या फळबागांची तसेच ढोबळी मिरची, शेवगा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

माणदेशातील क्रॉप पॅटर्न बदलू लागला आहे. ड्रॅगन फ्रुट, द्राक्षे, डाळिंब, बोर, कलिंगड, पपई, पेरू यासारख्या फळबागांची तसेच ढोबळी मिरची, शेवगा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अमोल काटे
दिघंची: माणदेशातील क्रॉप पॅटर्न बदलू लागला आहे. ड्रॅगन फ्रुट, द्राक्षे, डाळिंब, बोर, कलिंगड, पपई, पेरू यासारख्या फळबागांची तसेच ढोबळी मिरची, शेवगा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

यंदा पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात झाली तरीदेखील प्रयोगशील शेतकरी कमी पाण्यात नवनवीन प्रयोग करत वेगवेगळ्या पिकांकडे वळू लागला आहे. माणदेशात शेतकऱ्यांचा कल पारंपरिक पिके सोडून फळबागांकडे वाढला आहे. या भागात आंबा, द्राक्ष, ड्रॅगन फूट पालेभाज्या फळबागा तसेच नगदी पिकांनी बहरू लागले आहे.

कायमस्वरूपी दुष्काळाची ओळख असणाऱ्या आटपाडी तालुक्यात टेंभूचे पाणी आल्याने काही भागात पाणी पातळी चांगली आहे. पंधरा वर्षांपूर्वी या भागातील शेती निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. त्यावेळी शेतकरी गहू, ज्वारी, मका, बाजरी, कापूस ही पिके घेत होता यातून त्यांना उत्पादन मिळणे अस्थिर होते.

सन १९८८ ला आटपाडी तालुक्यात डाळिंब लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला, तेव्हापासून दुष्काळी भागाच्या माळरानावर डाळिंबाच्या बागा फुलू लागल्या व येथील शेतकरी फळबागा लागवडीकडे वळला. आज तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर विविध बागांच्या लागवडी झाल्या आहेत.

आटपाडीचे डाळिंब जगाच्या कोनाकोपऱ्यात पोहोचले आहे. शेतकऱ्यांनी माळरानावर डाळिंबाच्या फुलवल्या आहेत, मात्र बदलत्या हवामानाचा डाळिंब पिकावर होणारा परिणाम तेल्या रोगामुळे डाळिंबाला पर्याय म्हणून आता आंबा, द्राक्षे, पेरू, सीताफळ, बोर ड्रॅगन फूड या फळबागांचे क्षेत्र वाढू लागले आहे.

या भागातील शेतकऱ्यांची प्रयोगशीलता व कष्ट करण्याची तयारी त्यामुळे शेतकरी वेगवेगळ्या पिकांची लागवड करीत आहे. विविध फळबागांचे तसेच फळभाज्यांचे प्रयोग होऊ लागले आहेत.

दिघंचीचा भाजीपाला पुणे, मुंबईला पोहोचला
दुष्काळी पट्टयात शेतकऱ्यांना पावसाच्या अंदाजावर पिके घ्यावी लागत होती तेथे आता फळबागा फुलू लागल्या आहेत. दिघंची भागातून आता पुणे, मुंबईला ढोबळी मिरची, शेवगा, वांगी, मेथी, कोथिंबीर आदी पालेभाज्या विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवल्या जात आहेत, हासुद्धा बदलत्या क्रॉप पॅटर्नचा परिणाम आहे.

Web Title: Emphasis on experimental agriculture to overcome drought; Man's Changing 'Crop Pattern'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.