Join us

परभणी कृषि विद्यापीठातील अभियंता स्मिता सोलंकी यांचा राष्ट्रीय प्राणीमित्र पुरस्काराने सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 9:09 AM

भारतीय जीव जंतू कल्याण बोर्ड व मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी मंत्रालय, भारत सरकार यांच्या तर्फे दिनांक ४ ऑक्‍टोबर रोजी विश्व पशू दिनाचे औचित्य साधून नवी दिल्‍ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे राष्ट्रीय प्राणी मित्र पुरस्कार (बैल चलित औजारांच्या संशोधनाबद्दल) देऊन गौरविण्‍यात आले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील पशूशक्तीचा योग्य वापर योजना प्रमुख व संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी यांना भारतीय जीव जंतू कल्याण बोर्ड व मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी मंत्रालय, भारत सरकार यांच्या तर्फे दिनांक ४ ऑक्‍टोबर रोजी विश्व पशू दिनाचे औचित्य साधून नवी दिल्‍ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे राष्ट्रीय प्राणी मित्र पुरस्कार (बैल चलित औजारांच्या संशोधनाबद्दल) देऊन गौरविण्‍यात आले. सदरील पुरस्कार केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी मंत्री मा श्री. परशोत्तम रूपाला यांच्या हस्ते प्रदान करण्‍यात आला, यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मा डॉ. संजीव कुमार बल्यान व भारतीय जीव जंतू कल्याण बोर्डचे अध्यक्ष डॉ. ओ. पी. चौधरी, आयुक्त (पशुपालन) डॉ. अभिजित मित्रा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजने अंतर्गत डॉ. स्मिता सोलंकी यांनी विविध उपयुक्‍त बैलचलित कृषी अवचारांची निर्मिती करून शेतकरी बांधवापर्यंत हे तंत्रज्ञान पोह‍चविण्‍याकरिता मोठे योगदानाबद्दल त्‍यांना हा पुरस्‍कार देण्‍यात आला. पुरस्‍काराबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर आदीसह विद्यापीठ कर्मचारी व शेतकरी बांधवांनी त्‍यांचे अभिनंदन  केले.

टॅग्स :वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठविद्यापीठशेतकरीशेती