Join us

राज्यातील साखर कारखान्यांमध्ये इथेनॉलची निर्मिती व्हायलाच हवी 

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 06, 2023 7:00 PM

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये इथेनॉलची निर्मिती व्हायलाच हवी. यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत अशा सूचना मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही ...

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये इथेनॉलची निर्मिती व्हायलाच हवी. यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत अशा सूचना मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुखमंत्र्यांना आज सकाळच्या बैठकीतच दिलेल्या आहेत असे वक्तव्य गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात केले.

आतापर्यंत १० हजार कोटींची घोषणा केली असली तरीही जेवढे पैसे हवेत तेवढे देऊ,अशीही घोषणा त्यांनी केली आहे.पुण्यात केंद्रीय सहकार्य संस्थेच्या संकेतस्थळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार व इतर नेते उपस्थित होते.

सहकार क्षेत्राचा मोठा डेटा तयार होत आहे. त्यानुसार तुम्हाला तुमच्या गावात,जिल्ह्यात किंवा राज्यातील सहकार क्षेत्राशी संबंधित सगळी माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रत्येक वरिष्ठांना आपल्या गावाची संपूर्ण माहिती लगेच मिळेल आणि उपाययोजना करण्यात येणार आहे. हा डेटा बनवण्याचं 95 टक्के काम पूर्ण झाले  असल्याचे  ते म्हणाले.केंद्र सरकारच्या आणि सहकार खात्याचं नेमके व्हिजन काय आहे, हे त्यांनी सांगितले आहे. त्यात सहकार क्षेत्राच्या अनेक निर्णयांमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या समस्यांचं निराकरण झाले. 

कोणाच्याही नातेवाईकाला नोकरी मिळणार नाही तर फक्त कौशल्य असलेल्या व्यक्तीलाच नोकरी मिळणार असल्याचे ते म्हणाले. को-ऑपरेटिव्ह बॅंकांना मोठे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे आता या पुढे सहकार क्षेत्राशी संबंधित पारदर्शक होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पुण्याला सहकाराची पंढरी म्हटले  जाते  आणि  देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा 42 टक्के आहे. त्यामुळे उद्घाटनासाठी पुण्याची निवड केल्याचेही ते म्हणाले.  

टॅग्स :अमित शाहपुणेबँक