Join us

इथेनॉल वाचवते ५४ हजार कोटींचे परकीय चलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2023 12:00 PM

आयातीत इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशात जैव इंधनाचा वापर आता काळाची गरज बनली आहे. सध्या न देशात वापरल्या जाणाऱ्या एकूण इंधनापैकी ...

आयातीत इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशात जैव इंधनाचा वापर आता काळाची गरज बनली आहे. सध्या न देशात वापरल्या जाणाऱ्या एकूण इंधनापैकी ११ टक्के इंधन हे इथेनॉलमिश्रित असते. या वापरामुळेच देशाचे आतापर्यंत  सुमारे ५४ हजार कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे. 

गेल्या दोन वर्षांपूर्वी देशात ४३३ कोटी लिटर इथेनॉलचा वापर केला जात होता. त्यामुळे गेल्या आठ वर्षांमध्ये कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण ३१८ लाख टनांनी कमी झाले आहे.

जैव इंधनाचा वापर वाढावा यासाठी केंद्र व राज्य सरकारचे सकारात्मक पावले पडत असून, २०२५ पर्यंत एकूण इंधन वापरात इथेनॉलचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

"प्राज इंडस्ट्रीजने भाताच्या पेंढ्यांपासून इथेनॉलनिर्मिती करण्याचा प्रकल्प नुकताच हरयाणातील पानिपत येथे सुरू केला आहे. तसेच विमानांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनात इथेनॉलचा वापर करण्याबाबतचा प्रयोगही प्राजच्या सहकार्याने इंडियन ऑइलने सुरु केला आहे. २०२५ मध्ये विमान इंधनामध्ये १ टक्का जैव इंधन वापरल्यास सुमारे १४ कोटी लिटर इथेनॉलची गरज भासणार आहे तर हेच प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत नेल्यास देशात सुमारे ७० कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करावी लागणार आहे. - डॉ. प्रमोद चौधरी, अध्यक्ष, प्राज इंडस्ट्रीज, पुणे

आकडे काय सांगतात...?

अस्तित्वातील प्रकल्प

महाराष्ट्रभारत 

उसापासून इथेनॉलनिर्मिती प्रकल्प

११६२६३

निर्मिती क्षमता

२२५ कोटी लि.

६१९ कोटी लि.

धान्यांपासून इथेनॉल निर्मिती प्रकल्प

२८१२३

इथेनॉलनिर्मिती क्षमता

४२ कोटी लि.

३२८ कोटी लि.

एकूण इथेनॉलनिर्मिती प्रकल्प

१४४

३८६

एकूण इथेनॉलची निर्मिती क्षमता

२६७ कोटी लि.

९४७ कोटी लि.

उसाच्या रसापासून इथेनॉल

■ जैव इंधनाचा वापर वाढावा यासाठी खासगी कंपन्यांनीही तंत्रज्ञानाचा वाटा उचलला असून, पुण्यातील प्राज इंडस्ट्रीजने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीचा प्रायोगिक प्रकल्प नुकताच राबवला आहे.

■ त्यानुसार सध्या राज्यातील चार ते पाच साखर कारखाने या प्रकल्पावर काम करत असल्याची माहिती प्राजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

■ साखरनिर्मिती करून त्यापासून इथेनॉलनिर्मिती न करता थेट उसाच्या रसापासूनच इथेनॉलची निर्मिती होत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचा खर्च वाचला असून त्यांची कार्यक्षमता तसेच गाळपाचे दिवसदेखील वाढले आहेत. त्याचा थेट परिणाम रोजगार वाढण्यावर झाला आहे, असेही चौधरी यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीइंधन दरवाढऊससाखर कारखाने