Lokmat Agro >शेतशिवार > राज्यात खतांचा आणि कीटकनाशकांचा होतोय बेसुमार वापर; काय म्हणतोय माती आरोग्याचा रिपोर्ट?

राज्यात खतांचा आणि कीटकनाशकांचा होतोय बेसुमार वापर; काय म्हणतोय माती आरोग्याचा रिपोर्ट?

Excessive use of fertilizers and pesticides in the state; What does the soil health report say? | राज्यात खतांचा आणि कीटकनाशकांचा होतोय बेसुमार वापर; काय म्हणतोय माती आरोग्याचा रिपोर्ट?

राज्यात खतांचा आणि कीटकनाशकांचा होतोय बेसुमार वापर; काय म्हणतोय माती आरोग्याचा रिपोर्ट?

असंतुलित रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांचा बेसुमार वापर, पिकांच्या फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय पदार्थ आणि जैविक खतांचा कमी वापर, तापमान आदी विविध कारणांचा राज्यातील मातीच्या आरोग्यातर विपरीत परिणाम होत आहे.

असंतुलित रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांचा बेसुमार वापर, पिकांच्या फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय पदार्थ आणि जैविक खतांचा कमी वापर, तापमान आदी विविध कारणांचा राज्यातील मातीच्या आरोग्यातर विपरीत परिणाम होत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

महेश घोराळे
मुंबई : असंतुलित रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांचा बेसुमार वापर, पिकांच्या फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय पदार्थ आणि जैविक खतांचा कमी वापर, तापमान आदी विविध कारणांचा राज्यातील मातीच्या आरोग्यातर विपरीत परिणाम होत आहे.

बहुतांश जमिनीत नायट्रोजन, गंधक, झिंक आणि लोहाच्या कमतरता दिसून येत आहे. त्यामुळे मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी माती परीक्षण करूनच योग्य खते वापरावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

या घटकांची कमतरता

 सेंद्रिय कर्बगंधक (सल्फर)झिंकलोहबोरॉन
कमी४६.०८% क्षेत्र४३.५२%४२.७७%५९.९६%३१.२९%
प्रमाण०.५०% पेक्षा कमी<१०.० ppm<०.६ ppm<8.9 ppm<0.9 ppm
क्षेत्र१.४२ कोटी हेक्टर१.३४ कोटी हेक्टर१.३२ कोटी हेक्टर१.८५ कोटी हेक्टर९६.६१ लाख हेक्टर
योग्य-५६.४८%५७.२३%४०.०४%६८.७१%
जास्त१४.०३%----
प्रमाण०.७५% पेक्षा जास्त>१०.० ppm>०.६ ppm>४.५ ppm>0.9 ppm
क्षेत्र४३.३१ लाख हेक्टर१.७४ कोटी हेक्टर१.७६ कोटी हेक्टर१.२३ कोटी हेक्टर२.१२ कोटी

पिकांच्या वाढीसह उत्पादनावर थेट होतोय परिणाम
१) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या महाराष्ट्रातील जमिनीच्या आरोग्यावर आधारित अहवालातून पोषणतत्त्वांचे प्रमाण समोर आले. त्यात अनेक घटकांची कमतरता आहे.
२) राज्यात काही क्षेत्रे अत्यंत सुपीक, तर काही भागांत पोषणतत्त्वांची कमतरता असल्याने पिकांच्या वाढीसह उत्पन्न आणि गुणवत्तेवर याचा परिणाम दिसून येत आहेत.

या बाबी फायद्याच्या
९९.९७% माती ही नॉन-सॅलाइन आहे. मिठाचे प्रमाण कमी असल्याने पिकांची चांगली वाढ होते.
९९.९९% क्षेत्रात मँगनीजचे प्रमाण योग्य प्रकाश संश्लेषणात मदत, झाडांची वाढ वेगाने होण्यासाठी फायदा.
८८.८८% क्षेत्र पोटॅशियम बाबत समृद्ध झाडांची वाढ, रोगप्रतिकारक क्षमता.
९९.९८% क्षेत्रात तांब्याचे प्रमाण योग्य रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्त्वाचे.

मातीतील पोषणतत्त्वांची गरज लक्षात घेऊन, पीकनिहाय आवश्यक घटक आणि हवामान यानुसारच खते वापरण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी माती परीक्षण महत्त्वाचे आहे. - डॉ. संजय भोयर, मृद विज्ञान विभाग, पीडीकेव्ही अकोला

अधिक वाचा: खतांच्या वापरात पाचपट वाढ; किती खते वापरतोय आपण? वाचा सविस्तर

Web Title: Excessive use of fertilizers and pesticides in the state; What does the soil health report say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.