Join us

पिकांवर होणारा खर्च हि शेतीतून निघेना; शेतकरी बांधव मेटाकुटीला

By रविंद्र जाधव | Published: September 22, 2024 4:56 PM

शिऊर येथील चंद्रशेखर डुकरे गेल्या पंधरा वर्षांपासून ४ एकर क्षेत्रात कपाशी आणि मका यांसारखी खरीप पिके (kharif crop) घेत आहेत. मात्र, अलीकडे शेती करताना विविध समस्यांचा सामना करतांना ते मोलमजुरी करण्याकडे वळण्याचा विचारात आहे.

छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या, वैजापूर तालुक्यातील, शिऊर येथील चंद्रशेखर डुकरे गेल्या पंधरा वर्षांपासून ४ एकर क्षेत्रात कपाशी आणि मका यांसारखी खरीप पिके घेत आहेत. पाण्याची अल्प उपलब्धी असल्याने, त्यांचे कुटुंब उपजीविका करण्यासाठी फक्त खरीपात मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र, अलीकडे शेती करताना विविध समस्यांचा सामना करतांना ते मोलमजुरी करण्याकडे वळण्याचा विचारात आहे.

चंद्रशेखर म्हणतात, “गेल्या काही वर्षांत सर्व पिकांचे उत्पादन कमी झाले आहे. वातावरणीय बदल, मशागत, कीड आणि रोग नियंत्रण यासाठी येणारा खर्च वाढला आहे. यामुळे शेतीपेक्षा बँकेतील मुदत ठेव अधिक फायदेशीर वाटते.” त्यांनी सांगितले की, उत्पादनात घट होत असताना बाजार दर अनेक वर्षांपासून स्थिर आहे, त्यामुळे मोलमजुरी करून कुटुंब चालवणे वाईट नाही.

उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात खर्च वाढत आहे, जसे की मशागत, बियाणे खरेदी, लागवड, तण नियंत्रण, आंतर मशागत, कीड-रोग नियंत्रण आणि काढणी. नैसर्गिक आपत्तींमुळेही शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. शेतमाल विक्रीसाठी बाजारात गेल्यावर कमी दरांमुळे शेतकरी संकटात सापडतो, त्यामुळे चंद्रशेखर यांचा मोलमजुरीकडे कल दिसून येतो आहे किंबहुना इतर शेतकरी देखील या विचारात असू शकतात हे नाकारणे वावगे ठरणार नाही.

गेल्या वर्षी तुलनेत यंदा वाढलेले दर (प्रती एकरी)

 गेल्या वर्षी यंदा
नांगरणी१२०० रुपये १५०० रुपये 
वखरणी (कपाशी व तूर करिता)५०० रुपये ७०० रुपये 
कपाशी बियाणे७०० रुपये ९०० रुपये 
कपाशी, तूर लागवड मजुरी३०० ते ३५० रुपये ३५० ते ५०० रुपये
कांदा लागवड९ ते १० हजार १० ते १५ हजार 

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीक व्यवस्थापनबाजारसरकार