Lokmat Agro >शेतशिवार > महागडी फवारणी परवडेना, शिवारातील तूरीवर अळीचा प्रादूर्भाव

महागडी फवारणी परवडेना, शिवारातील तूरीवर अळीचा प्रादूर्भाव

Expensive spraying cannot be afforded, tur crop deceased, how to protect crop? | महागडी फवारणी परवडेना, शिवारातील तूरीवर अळीचा प्रादूर्भाव

महागडी फवारणी परवडेना, शिवारातील तूरीवर अळीचा प्रादूर्भाव

कसे कराल तूरीचे संरक्षण?

कसे कराल तूरीचे संरक्षण?

शेअर :

Join us
Join usNext

तुरीच्या पिकांवर विविध प्रजातीच्या अळ्याचा प्रादुर्भाव झाला असल्याने तुरीचे पीक धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांना महागड्या रासायनिक औषधांची फवारणी करण्यात येत आहे. यामुळे लावगडीचा खर्च वाढला असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.यंदा अपुऱ्या पावसामुळे खरीपांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खर्च निघेल की, नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. सोयाबीन, कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. तसेच परिसरात तुरीचे उत्पादन देखील कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षापासून अनेक संकटाचा सामना परिसरातील नागरिकांना करावा लागत आहे.

कापसानंतर तूर या पिकावर शेतकऱ्यांची भिस्त आहे. यंदा तुरीला चांगला बाजारभाव असल्याने उत्पादनामधून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. परंतु, तुरीवर सध्या अळीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे पीक धोक्यात सापडले आहे. गेल्या वर्षी देखील परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी झाली होती. यामुळे सजग दुसऱ्या वर्षी मराठवाड्यात जालना, घनसावंगी, परतूरमध्ये तूर पीकावर परिसरातील शेतकऱ्यांच्या तूर पिकाचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. 

महागडी औषध फवारणी परवडेना

• कापूस, सोयाबीननंतर आता तूर पिकातून चांगले उत्पन्न मिळेल या आशेवर शेतकरी आहेत. मात्र, तूर पिकांवर अज्ञात अळीचा प्रादुभाव जाणवत असल्याने शेतकरी संकटात आहेत. तुरीचे पीक सध्या फुलोरा व पापडी अवस्थेत आहे.

• तुरीच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच अळीचा हल्ला झाल्याने शेतकऱ्यांना महागड्या औषधींची फवारणी करावी लागत आहे. घनसावंगी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना फवारणीसाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

तुरीचे पीक जोमात; यंदा उत्पन्न वाढण्याची शक्यता

पीक दुहेरी संकटात

१. कोरडवाहू क्षेत्रामध्येचे लागवड केलेले तुरीचे पिक दुहेरी संकटात सापडले आहे.

२. परतीचा पाऊस बरसला नसल्याने जमिनीमध्ये ओलावा निर्माण झालेला नाही.

३. येण्यापूवाच नाही होत आहे. ओलाव्या नसल्याने पिके धोक्यात आली आहेत.

४. तुरीच्या  उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, कसे कराल संरक्षण?

कसे कराल कीड नियंत्रण?

१) तुरीमध्ये एकरी ५ कामगंध  सापळे (फेरोमोन ट्रॅप्स) पिकाच्या एक फूट उंचीवर लावावेत.

२) पक्ष्यांना बसण्यासाठी हेक्टरी ५० ते ६० पक्षी थांबे शेतात लावावेत. जेणेकरून त्यावर बसणारे पक्षी शेतातील अळ्या वेचून खातील.

3) पीक कळी अवस्थेत असताना ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

४) किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर (५ अळ्या प्रतिझाड) आढळून आल्यास इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के एस. जी. ४ ग्रॅम किंवा क्लोरॉन्ट्रानिलिप्रोल १८.५ एस. सी. ३ मिली. इंडोक्साकार्ब १४.५ एस. सी. ६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

 

 

Web Title: Expensive spraying cannot be afforded, tur crop deceased, how to protect crop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.