Join us

Sericulture या जिल्ह्यात एक हजारांहून अधिक एकरांवर होणार रेशीम शेतीचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 9:53 AM

जिल्ह्यात रेशीम शेती क्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाला कामाला लावले असून चालू वर्षात एक हजाराहून अधिक एकरवर रेशीम शेती करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

सोलापूर : जिल्ह्यात रेशीम शेती क्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाला कामाला लावले असून चालू वर्षात एक हजाराहून अधिक एकरवर रेशीम शेती करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तशा सूचना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित रेशीम उद्योग आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयो चारुशीला देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनीत पवार, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे, आरसिटीचे संचालक दीपक वाडेवाले, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ध्रुवकुमार बनसोडे, कॅनरा बँकेचे विजय पाटील यांच्यासह रेशीम उत्पादक शेतकरी महेश होनमाने, कैलास वडते गणेश मुळे, तुळशीराम विभुते आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, जिल्ह्यात रेशीम शेतीसाठी पोषक वातावरण असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये रेशीम शेतीबाबत जनजागृती करून रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी रेशीम उद्योग वाढीसाठी आपापल्या विभागाच्या वतीने योगदान देण्यासाठी योग्य नियोजन करावे. २०२३-२४ मध्ये १ हजार पेक्षा अधिक क्षेत्रावर रेशीम शेती केली जात आहे.

२०१९-२० मध्ये ३ एकर रेशीम शेतीचे उद्दिष्ट असताना ५०७ एकर, २०२०-२१ मध्ये ३०० एकरचे उद्दिष्ट असताना ५६७, सन २०२१-२२ मध्ये ५३० एकर, २०२२-२३ मध्ये ३५० एकर उद्दिष्ट असताना ६५३ एकर २०२३-२४ मध्ये २५० एकरचे उद्दिष्ट असताना १ हजार ९ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आलेली आहे.

जनजागृती करणाररेशीम उद्योग हा शेतीवर आधारित महत्त्वपूर्ण उद्योग असून रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे. सोलापूर जिल्ह्यातील हवामान रेशीमचे उत्पादन घेण्यास पोषक आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील रेशीम शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. जिल्ह्यात रेशीमचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

अधिक वाचा: Satbara Mother Name आता सातबाऱ्यावर लागेल आईचेही नाव

टॅग्स :रेशीमशेतीव्यवसायशेतकरीशेतीसोलापूरजिल्हाधिकारीराज्य सरकारकेंद्र सरकारसरकार