Lokmat Agro >शेतशिवार > Export pulses, cotton : कृषी प्रक्रियेला चालना; डाळ, कापसाची निर्यात वाचा सविस्तर

Export pulses, cotton : कृषी प्रक्रियेला चालना; डाळ, कापसाची निर्यात वाचा सविस्तर

Export pulses, cotton: Boosting agricultural processes; Read details on export of pulses, cotton | Export pulses, cotton : कृषी प्रक्रियेला चालना; डाळ, कापसाची निर्यात वाचा सविस्तर

Export pulses, cotton : कृषी प्रक्रियेला चालना; डाळ, कापसाची निर्यात वाचा सविस्तर

Export pulses, cotton : परदेशात होणाऱ्या निर्यातीत डाळी व कापसाच्या उत्पादनांचा मोठा वाटा आहे. 'एक जिल्हा एक उत्पादन' अंतर्गत डाळ व कापूस या पिकांची निर्यात वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Export pulses, cotton : परदेशात होणाऱ्या निर्यातीत डाळी व कापसाच्या उत्पादनांचा मोठा वाटा आहे. 'एक जिल्हा एक उत्पादन' अंतर्गत डाळ व कापूस या पिकांची निर्यात वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अकोला : जिल्ह्यातून परदेशात होणाऱ्या निर्यातीत डाळी व कापसाच्या उत्पादनांचा मोठा वाटा आहे. राज्याच्या तुलनेत जिल्ह्याची निर्यात अल्प असली तरी 'एक जिल्हा एक उत्पादन' अंतर्गत डाळ व कापूस या पिकांचा समावेश करून कृषी प्रक्रिया, उत्पादन व निर्यात वाढविण्याचा प्रयत्न उद्योग प्रशासनाकडून होत आहे.

जिल्ह्यातून गेल्या वर्षी ३०७ कोटी रुपयांची विविध उत्पादने निर्यात करण्यात आली होती. त्यात मुख्यत्वे डाळी (pulses) व कापूस (cotton) उत्पादनांबरोबरच औषधे, सोया मिल, स्टील उत्पादनांचा समावेश आहे.

जिल्ह्यातून मागील वर्षी चीन, बांगलादेश, श्रीलंका, इथिओपिया, नेपाळ, युनायटेड अरब अमिरात, व्हिएतनाम, युगांडा, केनिया आदी देशांमध्ये विविध उत्पादनांची निर्यात झाली.

३०७ कोटी रुपयांची उत्पादने २०२४ मध्ये जिल्ह्यातून निर्यात करण्यात आली होती. यात वाढ करण्याचा प्रयत्न आहे.

कापूस, डाळीचे हब

जिल्ह्याचे भौगोलिक स्थान, जमीन व वातावरण कापूस व डाळवर्गीय पिकांसाठी अनुकूल आहे. डाळींत तूर, उडीद, मूग आदींचे उत्पादन घेतले जाते. अकोला, अकोट व मूर्तिजापूर हे डाळ पिकांचे मेजर हब मानले जातात.

कृषी उत्पादनात कापूस हे मुख्य पीक आहे. अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड जिल्ह्यात प्राधान्याने होते. त्यानंतर डाळीचे उत्पादन घेतले जाते. कापसासाठी अकोला, अकोट व बोरगाव मंजू हे हब मानले जातात.

उलाढालीत १४ टक्के वाटा

गेल्यावर्षी अमरावती विभागातून निर्यातीत २ हजार कोटींहून अधिक उलाढाल झाली. त्यात जिल्ह्याचा वाटा जवळजवळ १४ टक्के आहे. हा वाटा वाढविण्यासाठी प्रशासनाकडून कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना, उद्योजकांना नव्या निर्यात संधींबाबत मार्गदर्शन, कार्यशाळा, टपाल विभागातर्फे निर्यात केंद्र हे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

अन्नप्रक्रिया उद्योग विस्तारासाठी पोषक

*  या पिकांनुसार जिल्ह्यात कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग विस्ताराची शक्यता व संधी आहे. कापसाचे धागे, गाठी, कापड अशा उत्पादनांना मागणी आहे. जिल्ह्यात सुमारे २५ पेक्षा अधिक जिनिंग-प्रेसिंग उद्योग आणि जवळजवळ ३० डाळ मिल आहेत.

* जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टपर्यंत (जेएनपीटी) उत्तम रस्ते कनेक्टिव्हिटी आहे. जिल्ह्यात ४ मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. त्यामुळे कापूस व डाळ पिकांचे एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत समावेश करण्यात आला आहे.

* नवउद्योजक व उद्योजकांनी त्यादिशेने वळविण्यासाठी एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत प्रयत्न होत आहेत.

हे ही वाचा सविस्तर :  Nafed center : 'नाफेड' खरेदीची सोयाबीन उत्पादकांना प्रतीक्षा वाचा सविस्तर

Web Title: Export pulses, cotton: Boosting agricultural processes; Read details on export of pulses, cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.