Lokmat Agro >शेतशिवार > धान खरेदीसाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांना या तारखेपर्यंत मुदतवाढ

धान खरेदीसाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांना या तारखेपर्यंत मुदतवाढ

Extension to this date for registered farmers to purchase paddy | धान खरेदीसाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांना या तारखेपर्यंत मुदतवाढ

धान खरेदीसाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांना या तारखेपर्यंत मुदतवाढ

याचा फायदा राज्यातील लाखो नोंदणीकृत शेतकऱ्यांना होणार आहे, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

याचा फायदा राज्यातील लाखो नोंदणीकृत शेतकऱ्यांना होणार आहे, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यास शासनाने दि. 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासनाने शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात धान खरेदी करण्याची मुदत 31 जानेवारी 2024 पर्यंत होती. मागील हंगामाच्या तुलनेत राज्यात अद्यापपर्यंत कमी धान खरेदी झाली आहे. याचा विचार करता शासनाने दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी दि. 31 मार्च 2024 रोजीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याचा फायदा राज्यातील लाखो नोंदणीकृत शेतकऱ्यांना होणार आहे, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत, खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना (नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो) धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीनधारणेनुसार प्रती हेक्टरी रू. २०,०००/- याप्रमाणे (दोन हेक्टरच्या मर्यादेत) प्रोत्साहनपर राशी देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.

 

Web Title: Extension to this date for registered farmers to purchase paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.