Join us

Fake Herbicide तणनाशक औषधीने केला शेतकऱ्यांचा घात; तणनाशक फवारणीचे परिणाम दिसेना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 10:27 AM

यावर्षी काही भागात सुरुवातीला पेरणी झाली तर काही भागात पहिल्या पावसात पेरणी आटोपली. पेरणीनंतर शेतात तण वाढू नये म्हणून शेतकऱ्यांनी पाऊस पडताच कृषी सेवा केंद्रावरून तणनाशक औषध खरेदी करून फवारणी केली. मात्र, तणनाशक फवारणी करूनही शेतातील तण गेले नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात यावर्षी काही भागात सुरुवातीला पेरणी झाली तर काही भागात पहिल्या पावसात पेरणी आटोपली. पेरणीनंतर शेतात तण वाढू नये म्हणून शेतकऱ्यांनी पाऊस पडताच कृषी सेवा केंद्रावरून तणनाशक औषध खरेदी करून फवारणी केली. मात्र, तणनाशक फवारणी करूनही शेतातील तण गेले नसल्याने तालुक्यातील शेतकरी हतबल झाले आहेत.

तेल्हारा तालुक्यात कपाशीपेक्षा सोयाबीन, तूर पेरणी अधिक झाली आहे. बागायतदार शेतकऱ्यांनी सिंचन सुविधा उपलब्ध असल्याने आधीच पेरणी केली व जूनमध्ये पाऊस आल्याने तालुक्यात पेरणी झाली. नंतर शेतातील पिकांत तण वाढू नये म्हणून शेतकऱ्यांनी तणनाशक औषध खरेदी करण्यासाठी एकच धूम केली.

सध्या बाजारात नवनवीन कंपन्या आल्याने मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. मात्र, कंपनी एजंट शेतकऱ्यांना पटवून बोगस तणनाशक औषध शेतकऱ्यांच्या माथी मारीत आहे. फवारणी करूनही शेतकरी हतबल झाले आहेत.

पाच एकर सोयाबीनमध्ये तण झाल्यावर त्यात तणनाशक औषध खरेदी करून फवारणी केली. मात्र, सध्या शेतात तण तसेच आहे. संबंधित अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. - वैशाली खारोडे, संचालिका, खरेदी-विक्री, तेल्हारा.

कृषी विभागाकडे तक्रारी दाखल

• शेतात तणनाशक फवारणी करूनही तण तसेच असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.

• शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे तर औषध कंपन्या मात्र बोगस तणनाशक औषध शेतकऱ्यांच्या माथी मारीत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

या गावात शेतकऱ्यांना फटका

तळेगाव बाजार, कोठा, अकोली, चांगलवाडी, शेरी, रायखेड, भांबेरी, हिंगणीसह बऱ्याच गावांमध्ये शेतात तणनाशक फवारणी करूनही काही फायदा झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटाका बसला आहे. शासनाने कंपनीविरुद्ध चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

शासनाने कारवाई करण्याची मागणी

शेतकऱ्यांच्या शेतमालाला आधीच भाव नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. त्यात यावर्षी बाजारात तणनाशक औषधीच्या नवनवीन कंपन्या आल्या असून, शेतकऱ्यांनी सोयाबीनमध्ये तणनाशक औषधे फवारणी करूनही शेतात तण तसेच असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शासनाने या कंपनीविरुद्ध कारवाई करावी अन्यथा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर यावे लागेल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने देण्यात आला आहे.

हेही वाचा - Dashparni Arka बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी

टॅग्स :पीक व्यवस्थापनशेतीअकोलातेल्हाराखरीपपाऊसपीकशेती क्षेत्र