Lokmat Agro >शेतशिवार > Fal Pik Anudan : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून फळपिकांसाठी घ्या इतक्या घटकांसाठी लाभ

Fal Pik Anudan : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून फळपिकांसाठी घ्या इतक्या घटकांसाठी लाभ

Fal Pik Anudan : Benefits for so many components for fruit crops through national horticulture Mission | Fal Pik Anudan : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून फळपिकांसाठी घ्या इतक्या घटकांसाठी लाभ

Fal Pik Anudan : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून फळपिकांसाठी घ्या इतक्या घटकांसाठी लाभ

सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करावेत

सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करावेत

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूर : जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रम अंतर्गत सन २०२४- २५ या आर्थिक वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यास अनुसूचित जाती प्रवर्गासाठी रक्कम रु.१३०.०५ लाख कार्यक्रम राबविण्यास मान्यता मिळाली आहे.

सदर योजनेतील घटक ड्रॅगन फ्रूट, अॅवोकॅडो, सुट्टी फुले, मसाला पिके, फळबागा पुनरुज्जीवन, सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरीण, शेडनेट हाऊस, हरितगृह, प्लास्टिक मल्चिंग, डाळिंब पिकासाठी अँन्टी हेलनेट कव्हर, मधुमक्षिका वसाहत व मधुमक्षिका संच,  ट्रॅक्टर २० एचपीपर्यंत, पॉवर टिलर ८ एचपीपेक्षा जास्त व कमी यांचा समावेश आहे.

तसेच पीक संरक्षण उपकरणे, पॅक हाऊस, पूर्व शीतकरणगृह, शीतखोली, शीतगृह, रेफरव्हॅन, रायपनिंग चेंबर, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, एकात्मिक शीतसाखळी, कांदाचाळ, स्थायी/फिरते विक्री केंद्र शीत चेंबरच्या सुविधेसह, द्राक्षपिकासाठी प्लास्टिक कव्हर इत्यादी घटकांचा समावेश आहे.

शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना अनुदानावर राबविण्यात येत आहेत. शिवाय शेतीपंपासाठी वीज मोफत करण्यात आली आहे. शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना जास्तीत जास्त प्रमाणात राबविण्यात येत आहेत.

शेतकऱ्यांकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक
या घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे. शेतकरीकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

अधिक वाचा: Kanda Pil Rog : कांदा पिकावरील पिळ रोगाच्या नियंत्रणासाठी करा हे सोपे उपाय

Web Title: Fal Pik Anudan : Benefits for so many components for fruit crops through national horticulture Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.