Falbag Lagvad : नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी फळाच्या शेतीकडे वळले आहेत. अर्धापूर, कंधार, मुदखेड, नायगाव, लोहा, भोकर, नांदेड, हदगाव या तालुक्यात मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत. (Falbag Lagvad)
फळबाग लागवड दीर्घ मुदतीची, जास्त गुंतवणुकीची गोष्ट असल्यामुळे सुरुवातीला झालेली चूक नंतर भरून काढता येत नाही. म्हणून लागवडीच्या नियोजनात जमिनीची निवड, मातीची तपासणी, फळपिकाची निवड, लागवडीचा आराखडा, जातिवंत कलमे, रोपांची निवड, पाण्याची उपलब्धता, बाजारपेठ या सर्व गोष्टींचा अभ्यास महत्त्वाचा आहे. (Falbag Lagvad)
विशेषतः कंधार तालुक्यात सीताफळ, आंबे या फळबागांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. कंधार येथील आंबा हा परदेशात जातो. त्याचबरोबर अर्धापूरची केळीही विदेशात जाते. (Falbag Lagvad)
या फळाबरोबरच सध्या स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुट फळांचीही शेती नांदेड जिल्ह्यात बरेच शेतकरी करीत आहेत. त्यामुळे त्यांना चांगले उत्पन्नही प्राप्त होत आहे.फळबागेसाठी शासनाकडून अनुदानही प्राप्त होते.
बारड येथील शेतकरी बालाजी उपवार हा तरुण शेतकरी मागील तीन वर्षापासून स्ट्रॉबेरची शेती करीत आहे. यातून त्यास भरघोस उत्पन्न मिळत आहे. (Falbag Lagvad)
अर्धापूरच्या केळीला परदेशात मागणी
अर्धापूर तालुक्यात केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. येथील केळीला इतर राज्यासह परदेशातही मोठी मागणी आहे. तालुक्यात केळी पीकासोबत ड्रॅगन फ्रूट, चिकु या फळांचेही उत्पन्न घेतले जात आहे.
जिल्ह्यातील शेतीच्या पद्धतीत सकारात्मक बदल
नांदेड जिल्ह्यात शेतकरी पारंपरिक पिकाशिवाय स्ट्रॉबेरी, चिकू, खरबूज, पेरू आणि सिताफळ यासारख्या फळशेतीकडे वळत आहेत. या बदलामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या चांगले उत्पन्न मिळत आहे. अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव येथील शेतकरी चिकू आणि खरबूज फळबागेच्या लागवडीद्वारे लाखो रूपयांचे उत्पन्न मिळवित आहेत.
ड्रॅगन फ्रुटची लागवड
जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. यातून चांगले उत्पन्न प्राप्त होत आहे.
मागील पाच वर्षांपासून स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेत आहे. यातून मला चांगले उत्पन्न मिळते. स्ट्रॉबेरी या फळबागासाठी शासानाने अनुदान द्यावे, जेणे करुन अधिकाधिक शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीकडे वळतील. तसेच स्ट्रॉबेरी या पीकासाठी विमा लागू करावा. - बालाजी उपवार, फळ उत्पादक
ड्रॅगन फ्रूट या फळांची लागवड अडीच एकरात केली आहे. इतर पीकांपेक्षा वेगळे पीक घ्यावे या दृष्टीकोणातून मी ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. ड्रॅगन फ्रुटला सध्या बाजारात मोठी मागणी वाढली आहे. मागील काही दिवसापासून हे फळ खाण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे त्याला चांगला दर मिळत आहे. - हनमंतराव लोलपोड, फळ उत्पादक