Pune : राज्यात कृषी, फलोत्पादन, आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्पादन आणि उत्पन्न् वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना, व्यक्ती, संस्था, शेतकरी गट, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कृषी विभागातर्फे विविध पुरस्कार देण्यात येतात. २०२०, २०२१ आणि २०२२ सालच्या पुरस्कार्थींचा सत्कार व पुरस्ताक वितरण कार्यक्रम २९सप्टेंबर रोजी मुंबईत पार पडणार आहे.
दरम्यान, २०२०, २०२१ व २०२२ सालच्या कृषी व संलग्न कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण ४४८ लोकांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, सेंद्रीय शेती कृषीभूषण, उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईख शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धेचे विजेते आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
पुरस्कारांची माहिती पुरस्काराचे नाव - लाभार्थी संख्या - प्रत्येक पुरस्कार्थींना दिली जाणारी रक्कम१) डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार - १ लाभार्थी - ३ लाखांचे रोख बक्षीस२) वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार - ८ लाभार्थी - २ लाखांचे रोख बक्षीस३) जिजामाता कृषीभूषण पुरस्कार - ८ लाभार्थी - २ लाखांचे रोख बक्षीस४) कृषीभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार - ८ लाभार्थी - २ लाखांचे रोख बक्षीस५) वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार - ८ लाभार्थी - १ लाख २० हजारांचे रोख बक्षीस६) उद्यान पंडित पुरस्कार - ८ लाभार्थी - १ लाखांचे रोख बक्षीस७) वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार - ४० लाभार्थी - ४४ हजारांचे रोख बक्षीस८) पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार - १० लाभार्थी९) युवा शेतकरी पुरस्कार - ८ लाभार्थी - १ लाख २० हजारांचे रोख बक्षीस१० ) पीकस्पर्धेतील पुरस्कार - २ हजारांपासून ५० हजारांपर्यंतचे रोख बक्षिसे