Lokmat Agro >शेतशिवार > जेव्हा गारपीटीनंतर पडलेली ज्वारी पुन्हा उभी राहिली

जेव्हा गारपीटीनंतर पडलेली ज्वारी पुन्हा उभी राहिली

Farmer brothers; Fallen sorghum crop rises but when? | जेव्हा गारपीटीनंतर पडलेली ज्वारी पुन्हा उभी राहिली

जेव्हा गारपीटीनंतर पडलेली ज्वारी पुन्हा उभी राहिली

ज्वारी पीक हे पोटरीच्या अवस्थेत असताना पडले तरी उठू शकते एकदा कणीस आले दाणे भरले मग अवघड आहे, पडलेल्या ज्वारीचे फोटो घ्या आणि चार दिवसांनी परत शेतात जा तुम्हाला ज्वारी उठण्याचा प्रयत्न करताना दिसेल.

ज्वारी पीक हे पोटरीच्या अवस्थेत असताना पडले तरी उठू शकते एकदा कणीस आले दाणे भरले मग अवघड आहे, पडलेल्या ज्वारीचे फोटो घ्या आणि चार दिवसांनी परत शेतात जा तुम्हाला ज्वारी उठण्याचा प्रयत्न करताना दिसेल.

शेअर :

Join us
Join usNext

गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा मंडळात ७० मिलीमीटर पाऊस झाल्याचे नोंद महसूल विभागाकडे झाली तीन दिवसापूर्वी या जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला त्याच्या परिणाम म्हणून खरीप रबी हंगामाचे नुकसान झाले. गंगापूर तालुक्यातील गुरु धानोरा शिवारातील गट मधील ७ मधील केशव मनोहर पवार या शेतकऱ्याचे तब्बल एक एकर मालदांडी ज्वारीचे पिक २७ नोंहेबरच्या अवकाळी पावसाने भुईसपाट झाले होते परत पाच दिवसांनी हे ज्वारी पिक खाली पडलेले उठत आहे.

गेल्या पाच दिवसांपूर्वी ज्वारी पिक जमीनीवर पडले यामुळे पिकाचे नुकसान झाले या संदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठचे रामेश्वर ठोंबरे यांना ही माहिती दिली. ज्वारी पीक सर्व जमिनीवर लोळण घेत आहे बातमी एकताच त्यांना वाईट वाटले अगोदरच ज्वारी पीक क्षेत्र कमी झाले त्यात असे विघ्न येत राहिली तर अवघड आहे पण त्यांना एक सांगितले की ज्वारी पीक हे पोटरीच्या अवस्थेत असताना पडले तरी उठू शकते एकदा कणीस आले दाणे भरले मग अवघड आहे, पडलेल्या ज्वारीचे फोटो घ्या आणि चार दिवसांनी परत शेतात जा तुम्हाला ज्वारी उठण्याचा प्रयत्न करताना दिसेल.

अवेळी आणि मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे रब्बी ज्वारीचे पीक जमिनीवर पडल्याचे नजरेत येत आहे पण हे ही लक्षात येत आहे की पडलेली ज्वारीचे ताटे परत उठू लागली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी करू नये यात हुरड्यसाठी पेरणी ही ऑगस्ट महिन्यात होते त्यामुळे या ज्वारीचे पिक हुरडा अवस्थेत असल्याने आलेल्या कणसाच्या वजनाने उठणे अवघड होईल. - रामेश्वर ठोंबरे, कृषि सहायक विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर

Web Title: Farmer brothers; Fallen sorghum crop rises but when?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.