केंद्रीय मधुमक्षिकापालन संशोधन व प्रशिक्षण संस्था, खादी आणि ग्रामोद्योग आयोग, सूक्ष्म व लघू आणि मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार, पुणे १६ ही अखिल भारतीय स्तरावर एकमेव अशी मधुमक्षिकापालन उद्योग या विषयावर संशोधन व प्रशिक्षण देणारी संस्था आहे. या संस्थेमार्फत मधुमक्षिकापालनामध्ये खालील विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. वर्ष २०२३-२४ करिता इच्छुक उमेदवारांकडून खालील प्रशिक्षणाकरिता अर्ज मागविण्यात येत आहे.
अ.क्र | प्रशिक्षण कार्यक्रम | कालावधी |
१ | मधमाशापालन प्रमाणपत्र (One month certificate course in beekeeping) (stipend course for SC/ST/BPL category) | एक महिना |
२ | अल्पावधी मधमाशापालन (Short term training) | पाच दिवस |
३ | राजान्य, पराग, प्रपोलीस, मेन, संकलन व संरक्षण प्रशिक्षण (Training on Collection & preservation of Royal jelly, Pollen, Propolis, wax etc.) | पाच दिवस |
४ | मध परीक्षण प्रशिक्षण (One day Honey Testing training) | एक दिवस |
५ | आग्यामाश्यापासून मध संकलन (Training on collection honey from Rock bee/Dorsata) | पाच दिवस |
वरील प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता अर्ज व इतर माहितीकरिता संस्थेच्या खालील पत्त्यावर संपर्क साधावा.
अधिक माहितीकरिता दूरध्वनी क्र. ०२०-२५६७५८६५, २५६५५३५१
(प्रशिक्षण विभाग मो. क्र. ८२३७४२१९६३ वरती संपर्क करावा.
Email - cbrtipune.kvic@gov.in
या व्यतिरिक्त वरील संस्थेमध्ये खालील सुविधा उपलब्ध आहेत
१) मधप्रक्रिया सयंत्र (Honey processing unit) आणि बोटलिंग युनिट सुद्धा कार्यरत आहे. इच्छुक मधपाळ (Beekeeper) आपल्या कच्च्या मधाचे प्रक्रियेसाठी संपर्क करू शकता.
२) या संस्थेमध्ये सेराना व मेलिफेरा बॉक्ससाठी लागणारा मेणपत्रा विक्रीसाठी उपलब्ध आहे.
३) या व्यतिरिक्त एक स्किल्ड लेबर कंत्राटी बेसिस एक वर्षाकरिता (२५-५० एपीस सेरेना कोलोनी संभाळ करण्याचा अनुभव आहे) अशा उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी इछुकांनी आपला बायोडाटा १० दिवसांच्या आत वरील मेलवरती पाठवावा.