Join us

शेतकरी बांधवानो, आता आधार कार्ड अपडेट करता येईल मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2023 12:10 PM

तुमचे ओळखपत्र, पुराव्याचा पत्ता आदी माहिती अपलोड करावी लागते. ही कागदपत्रे ऑनलाईन कोणतेही शुल्क न भरता १४ सप्टेंबरपर्यंत अपलोड करता येतील.

देशाची लोकसंख्याशास्त्रीय माहिती अचूक राहावी यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी नागरिकांना सातत्याने आधार कार्डावरील माहिती अपडेट करण्यासाठी आग्रह करत असते. तुमचे ओळखपत्र, पुराव्याचा पत्ता आदी माहिती अपलोड करावी लागते. ही कागदपत्रे ऑनलाईन कोणतेही शुल्क न भरता १४ सप्टेंबरपर्यंत अपलोड करता येतील. आधी यासाठी १४ जूनपर्यंत दिलेला अवधी दिला होता, ज्याला पुढे वाढ दिली आहे. हीच कागदपत्रे सामान्यपणे व्यक्तिशः कार्यालयात देणार असल्यास मात्र २५ रुपयांचे शुल्क भरावे लागेल.

स्टेटस ऑनलाईन कसे पाहावे?ओळखपत्र तसेच पत्ता यांत बदलासाठी केलेल्या विनंतीनुसार चेंज रिक्वेस्ट क्रमांक (यूआरएन) तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एसएमएसने पाठविला जातो. हा यूआरएन क्रमांक आणि आधार नंबर याच्या आधारे तुमच्या विनंतीची स्थिती पुढील पोर्टलवर पाहता येते. https://ssup.uidai.gov.in/checkSSUPStatus/checkupdatestatus

कागदपत्रे ऑनलाईन अपलोड कशी करावीत?- सर्व प्रथम, UIDAI https://uidai.gov.in/ च्या वेबसाईटवर लॉग इन करा. आधार नंबर टाकताच रजिस्टर मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल.- तुमचा दिसणारा फोटो आणि पत्ता तपासून पाहा.- तुमचा तपशील बरोबर असेल तर, 'मी पडताळणी करीत आहे की वरील माहिती बरोबर आहे, या टॅबवर क्लिक करावे.- दिसणारा तपशील चुकीचा असेल ड्राप डाऊन मेन्यूमधून अपलोड करावयाच्या कागदपत्रांवर क्लिक करा.- ओळखपत्र कागदपत्र अपलोड करा. फाईल साइज २ एमबीपेक्षा मोठी असू नये. फाईल जेपीईजी, पीएनजी किंवा पीडीएफ फॉरमॅटमधील असावी.- पत्त्यासंबंधी कागदपत्र अपलोड करा. (फाईल साइज २ एमबीपेक्षा मोठी असू नये. फाईल जेपीईजी, पीएनजी किंवा पीडीएफ फॉरमॅटमधील असावी.)तुमची याला संमती असल्याचे सबमिट करावे.

अपडेट केल्याचे काय फायदे?- ओळखपत्र आणि निवासाचा पत्ता याबाबत माहिती अपडेट केल्याने अनेक सोयी सुविधा विनासायास मिळू शकतात.- अनेक सेवा योजनांचे लाभ अचूकपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्यात मदत होते.- ही माहिती अचूक असल्यास तुम्हाला १७०० हून अधिक सरकारी तसेच बिगरसरकारी योजनांचे लाभ मिळू शकतात.

बदल कुणी, कधी करावा?१) तुमच्या जीवनात होणारे मोठे बदल जसे लग्न आणि त्यानंतर नाव आणि पत्ता यांत होणारा बदल ही माहिती नोंदविण्यासाठी बदल करून घ्यावा.२) काही कारणास्तव नव्या ठिकाणी राहण्यास गेले वा नवे घराची खरेदी केली असल्यास बदल करावा.३) बदललेला मोबाइल नंबर, इ-मेल आयडी आदी नोंदवण्यासाठी बदल करावा.

टॅग्स :आधार कार्डशेतकरीऑनलाइनकेंद्र सरकार