Lokmat Agro >शेतशिवार > Farmer id Agristack : प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यास प्रारंभ; होणार हे फायदे

Farmer id Agristack : प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यास प्रारंभ; होणार हे फायदे

Farmer id Agristack: Farmer IDs to be issued to farmers on Republic Day; These benefits will be provided | Farmer id Agristack : प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यास प्रारंभ; होणार हे फायदे

Farmer id Agristack : प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यास प्रारंभ; होणार हे फायदे

राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या फार्मर आयडी (अॅग्रिस्टॅक) प्रकल्पाचा दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रजासत्ताक दिनी शुभारंभ करण्यात येणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या फार्मर आयडी (अॅग्रिस्टॅक) प्रकल्पाचा दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रजासत्ताक दिनी शुभारंभ करण्यात येणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या फार्मर आयडी (अॅग्रिस्टॅक) प्रकल्पाचा दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रजासत्ताक दिनी शुभारंभ करण्यात येणार आहे.

एकाच वेळी सर्व गावातून या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. कृषी संलग्न विभागाच्या योजना सुलभ, पारदर्शक पद्धतीने राबवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी ही अॅग्रिस्टॅक योजना महत्त्वाची ठरणार आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यात २६ जानेवारी रोजी एकाच वेळी सर्व गावांतून तिचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यासाठी तहसीलदार किरण जमदाडे यांनी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचे संयुक्तपणे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

त्यात ग्रामसेवक, कृषी सहायक आणि तलाठी यांचा समावेश असणार आहे. २६ जानेवारी रोजी एकाच वेळी सर्व गावातून प्रारंभ होणार आहे. शेतकऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीला (सातबारा उतारा) जोडण्यात येणार आहे.

त्या आधारे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) शेतकऱ्यांना प्रदान करण्यात येणार आहे. उच्च गुणवत्तेचा डेटा व अॅग्रिस्टॅकद्वारे कृषी उत्पादने आणि सेवामध्ये नवकल्पना वाढवण्याचा प्रयत्न आहे.

फार्मर आयडीचे फायदे
१) पीएम किसान योजनेंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी फायदा होईल.
२) किसान योजनेतील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी आयडी वापरता येईल.
३) पिकासाठी कर्ज, किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड आदी शेती विकासाची कर्जासाठी वापर होईल.
४) पीकविमा तसेच आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत नुकसान भरपाईसाठी मिळविण्यासाठी आयडीचा वापर करता येणार आहे.
५) किमान आधारभूत किमतीवर शेतमाल खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीसाठी फायदा होईल.
६) शेतकऱ्यांना बाजारपेठेची माहिती, कृषी निविष्ठा, विपणन, तज्ज्ञांचे मार्गदर्शनासाठी या आयडीचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेली ही योजना आहे. फार्मर आयडी तयार करण्यासाठी आवश्यक ती माहिती स्थानिक पातळीवर देण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. प्रशासनाला सहकार्य केल्यास त्याची अंमलबजावणी होईल. - किरण जमदाडे, तहसीलदार, दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय

अधिक वाचा: Godavari Tur : करमाळा तालुक्यातील या शेतकऱ्याने ऊस लागवड रद्द करून घेतले गोदावरी तुरीचे विक्रमी उत्पादन; वाचा सविस्तर

Web Title: Farmer id Agristack: Farmer IDs to be issued to farmers on Republic Day; These benefits will be provided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.