भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर व कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० ऑक्टोंबर २०२३ रोजी शुक्रवार मोजे डोंगरगाव ता. पाथरी जि. परभणी येथे डॉ. प्रशांत भोसले, वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मराठवाड्यातील प्रमुख पिंक असणाऱ्या कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार मार्फत विशेष कापूस प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात व तामिळनाडु राज्यात राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्प अंतर्गत कापसाच्या उत्पादन वाढीसाठी कापूस लागवडीचे सघन लागवड तंत्रज्ञान व दादा लाड लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी या कार्यक्रमाचे कृषि विज्ञान केंद्र, परभणी तर्फे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. नारायणराव फसाटे, सरपंच, मौजे डोंगरगाव हे उपस्थित होते. मा. सरपंच यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन कशा प्रकारे शतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट कराता येईल या बाबत कृषि विज्ञान केंद्र, परभणी तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कृषि विज्ञान केंद्र, परभणी येथील तांत्रिक प्रशिक्षक श्री. कुंडलीक खुपसे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शेतकऱ्यांना सघन कापूस पिकाच्या लागवड पध्दती बद्दल सविस्तर माहिती दिली. योग्य वाणाची निवड, माती परिक्षणावर आधारीत संतुलित खतांचा वापर व सघन लागवड पध्दतीमध्ये वाढ नियंत्रकाचा योग्य प्रकारे वापर या बद्दल मार्गदर्शन केले. तसेच कापूस पिकातील दादा लाड लागवड तंत्रज्ञांना विषयी सविस्तर माहिती दिली.
तसेच शेतकऱ्यांना कापूस पिकावर येणाऱ्या किड, रोगांबाबत व त्यांचे एकात्मिक नियंत्रण कशाप्रकारे करावे या बाबत माहिती दिली. शेतकऱ्यांनी रासायनिक किटकनाशकांचा योग्य प्रकारे व शिफारशीनुसारच वापर करावा तसेच एकात्मिक किड व रोग नियंत्रण करतांना जैविक व भौतीक पध्दतीचाही वापर करावा असे आवाहन केले. तसेच कापसावर आलेल्या दहिया व नव्याने आढळून आलेल्या तंबाखूवरील विषाणुजन्य रोग या बाबत शेतकऱ्यांना आवगत केले. तसेच मा. सरपंच यांनी केलेल्या आवाहनानुसार कृषि विज्ञान केंद्रा मार्फत गरजे नुसार व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
शेतकऱ्यांनी पुढील हंगामात सघन लागवड पध्दतीचा वापर करुन आपल्या उत्पादकतेमध्ये वाढ करावी असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन श्री. अमित तुपे आणि डॉ. उषा सातपुते यांनी केले. या कार्यक्रमासाठी मौजे डोंगरगाव, किन्होळा, वरखेड या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.