Lokmat Agro >शेतशिवार > नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; वाचा सविस्तर

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; वाचा सविस्तर

Farmers affected by natural calamities will get loan waiver; Read in detail | नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; वाचा सविस्तर

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; वाचा सविस्तर

राज्यात जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक crop कर्ज loan माफ करण्यासाठी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

राज्यात जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक crop कर्ज loan माफ करण्यासाठी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रु. ५२,५६२.०० लाख इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त, पुणे यांनी रु. ३७९.९९ लाख निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार सदर योजनेसाठी सन २०२३-२४ साठी सन २०२३ च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रु. ३७९.९९ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

सदर योजनेसाठी सन २०२३-२४ साठी सन २०२३ च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रु. ३७९.९९ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. वित्त विभागाच्या दि.०५.०२.२०२४ रोजीच्या परीपत्रकानुसार मंजूर निधीपैकी ७० टक्के म्हणजे रु. २६५.९९ लाख (रु. दोनशे पासष्ट लाख नव्यान्नव हजार फक्त) एवढा निधी दिला जाणार आहे.

वरील निधी राज्यात जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

Web Title: Farmers affected by natural calamities will get loan waiver; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.