Join us

शेतकऱ्यांनो गवत काढताय जरा जपून या गवतापासून होऊ शकते अॅलर्जी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 11:47 AM

शेतात काम करताना अनेक वेळा ऊस, गवताची कुसळे लागून अंगावर जखमा होतात. विशेषतः पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. अंगाला खाज सुटून त्या जखमेला पाणी सुटू लागते.

शेतात काम करताना अनेक वेळा ऊस, गवताची कुसळे लागून अंगावर जखमा होतात. विशेषतः पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. अंगाला खाज सुटून त्या जखमेला पाणी सुटू लागते. वेळेत उपचार केले नाहीत तर जखम चिघळून त्याचा इतर त्वचेवर परिणाम होऊ शकतो.

त्वचेबरोबरच काही लोकांना शिंका येणे, डोळे लाल होणे, आदी त्रास सुरू होतो. ऊस किंवा गवत कापताना योग्य ती खबरदारी घेण्याची गरज असून, ज्यांना अॅलर्जीचा त्रास आहे, त्यांनी तर अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

अॅलर्जीमुळे हा त्रास..• सुरुवातीला शिंका येतात.• घशा खवखवणे, नाकातून सतत पाणी वाहते.• डोकेदुखी व डोळ्ळ्याभोवती सूज येते.• डोळे, कान, नाकासह संपूर्ण चेहऱ्याला खाज सुटते.• अंगावर पुरळ येणे व झोपेला त्रास होणे.• काही लोकांना अॅलर्जीचा त्रास दोन ते तीन आठवड्यांपर्यंत राहू शकतो.

अॅलर्जी टाळण्यासाठी हे करा..• गवत अथवा उसाचा पाला काढताना अंग पूर्ण झाकून घ्यावे.• पायांत बूट व हातांत ग्लोव्हज घालावेत.• ज्यांना कुसळाची अॅलर्जी आहे, त्यांनी तोंडाला मास्क लावावा.• शेतातून घरी आल्यानंतर गरम पाण्याने अघोळ करावी.• शेतातील कपडे घराच्या बाहेर ठेवावीत.• त्यातून अॅलर्जी झाली तर वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घ्यावेत.

कुसळी गवत कापताना काळजी घ्या- शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते.दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढल्याने ओली वैरण म्हणून गाजर गवत, कडवळ, मका उसाचा पाला, आदींचा वापर केल जातो.विशेषतः कुसळी गवत कापताना काळजी घ्यावी लागते. त्याचबरोबर उसाचे काही वाणही कुसळी आहेत.त्यांचा पाला काढताना हातासह सर्वच शरीराला कुसळे लागतात; त्यातून कूस अंगावर उडाल्याने नाका-तोडांतून ती पोटात जाते.कुसळामुळे अंगावर जखमा होऊ शकतात, त्याचबरोबन नाका-तोंडातून पोटात गेल्याने सर्दी, खोकला, ताप येऊ शकतो.यासाठी अशा प्रकारचे गवत, उसाचा पाला काढताना शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे.

अधिक वाचा: उसात १६ प्रकारची आंतरपीक घेत मच्छिंद्रराव कशी करताहेत नफ्याची शेती? वाचा ही यशोगाथा

टॅग्स :शेतकरीशेतीपीककोल्हापूरऊसदुग्धव्यवसायव्यवसाय