Lokmat Agro >शेतशिवार > Summer Chilli माळशेज परिसरात उन्हाळी मिरची लावण्यावर शेतकऱ्यांचा भर बाजारात मिळतोय चांगला दर

Summer Chilli माळशेज परिसरात उन्हाळी मिरची लावण्यावर शेतकऱ्यांचा भर बाजारात मिळतोय चांगला दर

Farmers are getting good price in the market for planting summer chillies in Malshej area | Summer Chilli माळशेज परिसरात उन्हाळी मिरची लावण्यावर शेतकऱ्यांचा भर बाजारात मिळतोय चांगला दर

Summer Chilli माळशेज परिसरात उन्हाळी मिरची लावण्यावर शेतकऱ्यांचा भर बाजारात मिळतोय चांगला दर

जुन्नर तालुक्यातील माळशेज परिसरात अनेक गावातील शेतकऱ्यांनी शेतात बेड तयार करून त्यावर मल्चिंग पेपरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ड्रिपच्या साह्याने मात्रा देऊन, मांडव व बांधणी करून मार्च, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व उन्हाळी मिरचीची लागवड केली आहे.

जुन्नर तालुक्यातील माळशेज परिसरात अनेक गावातील शेतकऱ्यांनी शेतात बेड तयार करून त्यावर मल्चिंग पेपरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ड्रिपच्या साह्याने मात्रा देऊन, मांडव व बांधणी करून मार्च, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व उन्हाळी मिरचीची लागवड केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

ओतूर : जुन्नर तालुक्यातील माळशेज परिसरात अनेक गावातील शेतकऱ्यांनी शेतात बेड तयार करून त्यावर मल्चिंग पेपरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ड्रिपच्या साह्याने मात्रा देऊन, मांडव व बांधणी करून मार्च, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व उन्हाळी मिरचीची लागवड केली आहे.

यावर्षी मात्र दरवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक तापमान असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या लागवड केलेल्या मिरची रोपाला उन्हाचा थोडा झटका बसला. त्यात शेतकऱ्यांनी पुन्हा त्या पिकाची फवारणी करून मिरची जगविण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे यंदा माळशेज परिसरात मिरचीचे पीक बहरात आले आहे. 

भांडवली खर्च करून शेतकऱ्यांनी तापमानावर मात करून योग्य नियोजन केले आहे. त्यामुळे मिरची चांगलीच बहरात आली असून ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, ठीकेकरवाडी, अहिनवेवाडी सारणी, आदी शिवारात मिरचीचे पीक बहरून आले आहे.

मार्च व एप्रिल महिन्यात लागवड केलेली मान्सूनपूर्व मिरची मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तोडणीला आली असून सध्या मिरचीला १० किलोला ७५० ते ८०० भाव बाजार समितीत आहे.

चांगला बाजारभाव मिळण्याची अपेक्षा
वावर्षी मिरचीला चांगला भाव असल्याने मार्च, एप्रिल व मे दरम्यान लागवड केलेल्या मिरची पिकाला जून ते जुलै दरम्यान सुरुवातीला चांगला भाव मिळतो. सध्या मिरची पिकावर औषधी फवारणी सुरू असून मिरचीची निगा राखणे सुरू आहे. चांगले भाव राहणे एवढीच अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

उत्पादन चांगले
-
उष्ण आणि दमट हवामानात मिरची पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगले मिळते. मिरची पिकाची लागवड पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तीनही हंगामात करता येते.
पावसाळात जास्त पाऊस व ढगाळ वातावरण असल्यास फूलांची गळ जास्त होते.
पाने व फळे कुजतात. मिरचीला ४० इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले मिरचीच्या झाडांची आणि फळांची वाढ २५ ते ३० सेल्सिअस तापमानाला चांगली होते. आणि उत्पादनही भरपूर येते.
तापमानातील तफावतीमुळे फळे फुले गळ मोठ्या प्रमाणात होते.

आर्थिक घडी मिरचीमुळे सुरळीत
शेतकरी सध्या पिकाला ठिबकद्वारे पाणी देत मिरची जगविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे दोन दिवसांपासून हवामानात गारवा निर्माण झाल्याने तापमानापासून काहीसा बचाव झाला आहे.
शेतकरी दरवर्षी मिरची पिकातून लाखोचे उत्पन्न घेत असल्याने शेतकऱ्यांची विस्कटलेली आर्थिक घडी मिरचीमुळे सुरळीत होण्यास मदत होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
• या काळात बाजारपेठेत मिरचीला मोठी मागणी असते. त्यामुळे जास्त भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याने उन्हाळी मिरची लावण्यावर शेतकऱ्यांचा अधिकचा भर आहे.
• रोजच्या आहारात मिरची ही अत्यावश्यक असते. बाजारात हिरव्या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे.

अधिक वाचा: Ginger Market आले लागवड करावी का? कसा चाललाय बियाण्याचा भाव?

Web Title: Farmers are getting good price in the market for planting summer chillies in Malshej area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.