Lokmat Agro >शेतशिवार > शेतकरी दादांनो अन् ताईंनो शेतकाम करतांना काळजी घ्या; उष्माघात होण्याची शक्यता वाढली

शेतकरी दादांनो अन् ताईंनो शेतकाम करतांना काळजी घ्या; उष्माघात होण्याची शक्यता वाढली

Farmers, be careful while farming; the chances of heatstroke have increased | शेतकरी दादांनो अन् ताईंनो शेतकाम करतांना काळजी घ्या; उष्माघात होण्याची शक्यता वाढली

शेतकरी दादांनो अन् ताईंनो शेतकाम करतांना काळजी घ्या; उष्माघात होण्याची शक्यता वाढली

Farmer Care In Summer Heat Stroke : राज्यात सध्या सर्वत्र उष्णतेची तीव्रता वाढत आहे. ज्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे. परिणामी सध्या शेतकऱ्यांनी शेतात काम करतांना वेळेचे भान ठेवून काम करणे गरजेचे आहे.

Farmer Care In Summer Heat Stroke : राज्यात सध्या सर्वत्र उष्णतेची तीव्रता वाढत आहे. ज्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे. परिणामी सध्या शेतकऱ्यांनी शेतात काम करतांना वेळेचे भान ठेवून काम करणे गरजेचे आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात सध्या सर्वत्र उष्णतेची तीव्रता वाढत आहे. ज्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे. परिणामी सध्या शेतकऱ्यांनी शेतात काम करतांना वेळेचे भान ठेवून काम करणे गरजेचे आहे.

शेत शिवारामध्ये गहू, ज्वारी, बाजरी काढणी आणि हंगामाच्या शेवटच्या कामांचा वेग वाढला आहे. तर तापमान ३० डिग्री सेल्सियसच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काम करतांना पुढील उपाय केले पाहिजे. 

काम करण्याची योग्य वेळ ठरवा

सकाळी ७ ते १० व दुपारी ४ ते ६ या वेळेत काम करा कारण या वेळी उष्णता कमी असते.

पाणी भरपूर प्या

उष्णतेमुळे शरीरातून घाम जास्त निघतो, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. सतत पाणी किंवा मीठपाणी पिऊन शरीराचे हायड्रेशन संतुलित ठेवावे.

हलके कपडे घाला

पांढऱ्या रंगाचे आणि हलके कपडे घालल्याने उष्णतेपासून बचाव होतो.

सावलीत विश्रांती घ्या

काम करत असताना थोड्या थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घ्या. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते.

टोपी, रुमाल, गमछा आदींचा वापर करा 

सूर्याच्या प्रत्यक्ष प्रकाशापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी, रुमाल, गमछा किंवा अन्य काही संरक्षक वस्त्र वापरा.

शारीरिक स्थितीला लक्ष ठेवा

शारीरिक वेदना झाल्यास जसे की थकवा, घाम कमी येणे, किंवा तोंडाला कोरडे पडणे हे उष्माघाताची पूर्वसूचना असू शकतात. अशा वेळी ताबडतोब पाणी आणि मीठ पाणी प्या आणि विश्रांती घ्या. तसेच त्वरित वैद्यकीय सल्लागारांशी चर्चा करा. 

मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या

५ वर्षांखालील मुलं आणि ६५ वर्षांवरील वृद्धांना उष्माघात होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सदरील वयोगटातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. 

हेही वाचा : नारळाच्या नियमित सेवनाने मिळेल उभारी; सदृढ आरोग्याची नारळ आहे गुरुकिल्ली

Web Title: Farmers, be careful while farming; the chances of heatstroke have increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.