Lokmat Agro >शेतशिवार > आंबा, सीताफळाला चांगला बाजारभाव मिळाल्याने शेतकरी झाले मालामाल !

आंबा, सीताफळाला चांगला बाजारभाव मिळाल्याने शेतकरी झाले मालामाल !

Farmers became rich due to getting good market price for mango and sitafal! | आंबा, सीताफळाला चांगला बाजारभाव मिळाल्याने शेतकरी झाले मालामाल !

आंबा, सीताफळाला चांगला बाजारभाव मिळाल्याने शेतकरी झाले मालामाल !

८ हजार ४०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली, डाळिंबाचे क्षेत्र ६ हजार हेक्टर

८ हजार ४०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली, डाळिंबाचे क्षेत्र ६ हजार हेक्टर

शेअर :

Join us
Join usNext

आंबा व सीताफळ लागवडीखालील क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. या दोन्ही पिकांखाली जिल्ह्यात सध्या ८ हजार ४०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. डाळिंबाखालील क्षेत्र मात्र अजूनही जिल्ह्यात सर्वाधिक सुमारे सहा हजार हेक्टर आहे.

आंबा व सीताफळाला मिळणारा दर हा मोठा घटक असल्याने या फळपिकांनी शेतकऱ्यांना मालामाल केले आहे. इंदापूर तालुक्यात सर्वाधिक फळबागांचे क्षेत्र आहे. त्यातून उत्पन्न मिळत आहे.

सर्वाधिक क्षेत्र डाळिंबाचे

■ जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र डाळिंब पिकाखाली ५ हजार ९०२ हेक्टर इतके आहे. मात्र, यात सातत्याने घट होत आहे. त्याची जागा आता आंबा व सीताफळ पिकांनी घेतली आहे.

■ आंबेगाव, शिरूर, खेड, जुन्नर, पुरंदर, इंदापूर या तालुक्यांत या दोन्ही फळपिकांखालील क्षेत्रात वाढ होत आहे.

■ क्षेत्रनिहाय विचार केल्यास डाळिंबानंतर सीताफळाखालील क्षेत्र असून ते ४ हजार ६११ हेक्टर इतके आहे. तर आंब्याखालील क्षेत्र ४ हजार ४०२ हेक्टर इतके आहे.

माझ्याकडे सीताफळाची ८ एकर बाग आहे. चांगले बाजारभाव मिळाल्यास एकरी 3 लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. उसापेक्षा हे पीक सोपे आहे. तसेच भाजीपाला पिकांपेक्षा यात मज्री कमी लागते. भाजीपाला पिकात मजुरांची सारखी गरज भासते. साधा शेतकरीही सीताफळ पीक घेऊ शकतो.- शिवाजी म्हसे, शिरूर

आमच्याकडे आंब्याची चार जातींची बाग आहे. सरासरी एकरी ५० हजार रुपये खर्च येतो. त्यातून एकरी एक लाखापर्यंत उत्पन्न मिळते.- मारुती पाटील, इंदापूर

दोन एकर क्षेत्रात चार लाखांचे उत्पन्न

आंबा व सीताफळाला हमखास बाजार उपलब्ध झाले आहे. वाशी मार्केटमधून दुबई, मध्य आशियात या फळांची निर्यात वाढली आहे. त्यामुळे डाळिंबाला पर्याय म्हणून या पिकांकडे शेतकरी वळले आहेत. - संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

आंबा व सीताफळापासून एका एकरातून सुमारे १० ते १२ टन उत्पादन मिळते. खर्च वजा जाता एकरी दीड ते २ लाखांचे उत्पन्न मिळते. दोन एकरांतून किमान ४ लाखांचे उत्पन्न मिळते.

Web Title: Farmers became rich due to getting good market price for mango and sitafal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.