Lokmat Agro >शेतशिवार > मजुरांच्या समस्येपुढे शेतकरी होताहेत आत्मनिर्भर; आधुनिक यंत्रांचा शेतात वापर वाढला

मजुरांच्या समस्येपुढे शेतकरी होताहेत आत्मनिर्भर; आधुनिक यंत्रांचा शेतात वापर वाढला

Farmers become self-reliant before labor problem; The use of modern machinery in the fields increased | मजुरांच्या समस्येपुढे शेतकरी होताहेत आत्मनिर्भर; आधुनिक यंत्रांचा शेतात वापर वाढला

मजुरांच्या समस्येपुढे शेतकरी होताहेत आत्मनिर्भर; आधुनिक यंत्रांचा शेतात वापर वाढला

शेतशिवारात विविध प्रकारच्या कामांसाठी वेळोवेळी मजुरांची आवश्यकता भासते. मात्र अलीकडील सर्वत्र मजुरांची समस्या बिकट होत आहे. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःच स्वतःला सक्षम करून घेतले आहे. शेतीत वेळोवेळी प्रगती व सुधारणा काळजी गरज आहे याचाच प्रत्यय आता शेतकरी (Farmer) आपल्या कृतीतून दाखवून देत आहे. 

शेतशिवारात विविध प्रकारच्या कामांसाठी वेळोवेळी मजुरांची आवश्यकता भासते. मात्र अलीकडील सर्वत्र मजुरांची समस्या बिकट होत आहे. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःच स्वतःला सक्षम करून घेतले आहे. शेतीत वेळोवेळी प्रगती व सुधारणा काळजी गरज आहे याचाच प्रत्यय आता शेतकरी (Farmer) आपल्या कृतीतून दाखवून देत आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

शेतशिवारात विविध प्रकारच्या कामांसाठी वेळोवेळी मजुरांची आवश्यकता भासते. मात्र अलीकडील सर्वत्र मजुरांची समस्या बिकट होत आहे. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःच स्वतःला सक्षम करून घेतले आहे. शेतीत वेळोवेळी प्रगती व सुधारणा काळजी गरज आहे याचाच प्रत्यय आता शेतकरी आपल्या कृतीतून दाखवून देत आहे. 

गहू पिकांच्या आंतरमशागतीसाठी तसेच इतर शेतीकामांसाठीशेतकरी आज मानवचलित यंत्रांचा वापर करून आपली शेती अधिक कार्यक्षमतेने करीत आहेत. सध्या रब्बीतील गहू, मका, हरभरा, कांदा अशा विविध पिकांमध्ये आंतरमशागतीसाठी मजुरांवर अवलंबून रहावे लागत होते. 

मात्र यामध्ये वेळ, शारीरिक श्रमाची वाढ, तसेच खर्चाचा वाढता बोजा यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यावर उपाय म्हणून आता शेतकरी मानवचलित यंत्रांचा वापर करीत आहेत. ज्यामुळे अधिक श्रम, वेळ आणि खर्च वाचवता येतो आहे.

मानवचलित यंत्राचे खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी सहजरित्या शेतीमध्ये वापरता येते आणि शेतकऱ्यांना कमी वेळात जास्त कामे पूर्ण करणे शक्य होते. ज्यात सध्या शेतकरी गहू पिकांमध्ये आंतरमशागतीसाठी यंत्र वापरून पिकांच्या दोन सरीतील माती हलविण्यासाठी आणि गवत काढण्याचे काम करत आहे.

खर्चात बचत सोबत वेळेत काम 

पारंपरिक पद्धतीने गहू, मका पिकांत तण व्यवस्थापन करण्यासाठी कोळपणी करायला एकरी ५०० रुपयांचा खर्च होतो. तर मजुरांमार्फत निदणी करायला १० ते १२ मजूर प्रती एकर एक दिवस वेळ लागतो. ज्यात किमान ३५० रुपये प्रती मजूर खर्च येतो. मात्र हेच काम मानव चलित यंत्राणी करतांना एक व्यक्ती एका दिवसांत एक एकर क्षेत्रातील तण व्यवस्थापन करू शकतो. त्यामुळे हे आधुनिक यंत्र शेतकऱ्यांना अधिक फायद्याचे ठरत आहे.  

हेही वाचा : Farmer Success Story : अभियंता तरुणाचा यशस्वी फूलशेती प्रयोग; तीन एकरात बहरली फुलांची राणी 'शेवंती'

Web Title: Farmers become self-reliant before labor problem; The use of modern machinery in the fields increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.