Lokmat Agro >शेतशिवार > शेतकऱ्यांनो सावधान! शेततळ्याची ताडपत्री चोरीला; पैठणमधील धक्कादायक घटना

शेतकऱ्यांनो सावधान! शेततळ्याची ताडपत्री चोरीला; पैठणमधील धक्कादायक घटना

Farmers beware! Farm tarpaulin stolen; Shocking incident in Paithan | शेतकऱ्यांनो सावधान! शेततळ्याची ताडपत्री चोरीला; पैठणमधील धक्कादायक घटना

शेतकऱ्यांनो सावधान! शेततळ्याची ताडपत्री चोरीला; पैठणमधील धक्कादायक घटना

या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पैठण : शेतीतल वस्तू किंवा शेतमाल चोरीला गेल्याच्या घटना घडल्याचं आपण ऐकलं असेल पण शेततळ्यात पसरवलेली ताडपत्री (शेततळ्याचा कागद) चोरीला गेल्याची घटना आपण क्वचितच ऐकली असेल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील देवगाव येथील नर्मदाबाई बबन गिते यांच्या शेततळ्यातील ताडपत्री चोराने कापून नेल्याची घटना घडली आहे. 

अधिक माहितीनुसार, नर्मदाबाई गिते यांची  थापटी- ब्राम्हणगाव रोडलगत ८ एकर शेती असून त्यात एक ३५×३५ मीटर अंतराचे शेततळे आहे. बबनराव गिते हे बुधवार (दि.२२) सायंकाळी शेतात चक्कर मारण्यासाठी गेले असता, त्यांना त्यांच्या शेततळ्याची ताडपत्री चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

दरम्यान, त्यांच्या शेततळ्यात सध्या केवळ दोन फूट पाणी असल्यामुळे पाणी नसलेल्या भागातील सर्व ताडपत्री चोरांनी कापून नेली. या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर मागच्या वर्षीही याच गावातील केदारनाथ गिते यांच्या ही शेततळ्यातील ताडपत्री चोरीला गेल्याची घटना घडली होती.

या घटनेनंतर शेततळ्यातील ताडपत्रीचे भुरट्या चोरट्यांपासून संरक्षण कसे करावे असा पेच शेतकऱ्यांना पडला आहे. तर काळजी घेण्याचे आवाहन स्थानिक शेतकऱ्यांनी केले आहे. 

Web Title: Farmers beware! Farm tarpaulin stolen; Shocking incident in Paithan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.