Join us

शेतकऱ्यांना लिंकींगची सक्ती; आता व्हॉटस‌अपवर करता येणार तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 5:53 PM

खताची लिंकिंग करणा-या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतक-यांना तक्रार करण्यासाठी तात्काळ व्हाट्सअप क्रमांक सुरू करुन तो शेतक-यांपर्यंत पोहचवा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागला दिले आहेत.

खत विक्रेते शेतक-यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकून फसवणुक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खताची लिंकिंग करणा-या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतक-यांना तक्रार करण्यासाठी तात्काळ व्हाट्स अॅप क्रमांक सुरू करुन तो शेतक-यांपर्यंत पोहचवा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागला दिले आहेत.

कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत त्यांनी मंत्रालयात कृषी विभागाचा तब्बल अडीच तास आढावा घेतला यावेळी श्री मुंडे बोलत होते. या बैठकीला अपर मुख्य सचिव, ,अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख, कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमलसिंग, सहसचिव गणेश पाटील, संचालक विस्तार व सेवा विकास पाटील तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

शेतक-यांनी सदर व्हट्स अॅप क्रमांकावर तक्रार केल्यावर त्यांच्या नावाबाबत गोपनियता ठेवण्यात येईल. तसेच संबंधित जिल्ह्यातील भरारी पथकांना मेसेज जाऊन त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी तपासणी करण्याच्या सूचना श्री मुंडे यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीखरीप