Lokmat Agro >शेतशिवार > कुजलेल्या बांबूच्या खोडापासून शेतकऱ्यांना मिळू शकते कार्बन क्रेडिट

कुजलेल्या बांबूच्या खोडापासून शेतकऱ्यांना मिळू शकते कार्बन क्रेडिट

Farmers can get carbon credit from rotting bamboo trunks | कुजलेल्या बांबूच्या खोडापासून शेतकऱ्यांना मिळू शकते कार्बन क्रेडिट

कुजलेल्या बांबूच्या खोडापासून शेतकऱ्यांना मिळू शकते कार्बन क्रेडिट

बांबू ही अशी वनस्पती आहे ज्या वनस्पतीचा एकही भाग वाया जात नाही.

बांबू ही अशी वनस्पती आहे ज्या वनस्पतीचा एकही भाग वाया जात नाही.

शेअर :

Join us
Join usNext

बांबू ही अशी वनस्पती आहे ज्या वनस्पतीचा एकही भाग वाया जात नाही. बांबूच्या प्रत्येक भागापासून आपण फायदा करून घेऊ शकतो.  त्याचप्रमाणे बांबू तोडल्यानंतर जमिनीत राहिलेल्या खोडापासूनही आपल्याला फायदा होतो. 

बांबू तोडल्यानंतर काही दिवस उलटले की, ते खोड वाळून जाते. या खोडामुळे शेतकऱ्याची जमीन अडकून पडते. सदर जमिनीत शेतकऱ्यांना दुसरे पीक घेता येत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी जर ते बांबूचे खोड काढले तर त्या बांबूच्या खोडापासून वेगवेगळ्या वस्तू बनवता येऊ शकतात. या वस्तू टिकाऊ आणि आकर्षक असतात. खोडापासून गणपती, गरुड, मुखवटे तयार करता येतात. 

बांबूच्या खोडामध्ये कार्बन स्टोअर केला जातो. तोडणीनंतर चार ते पाच वर्षे बांबूचे खोड जमिनीत राहते त्यामुळे जमिनीमध्ये कार्बन स्टोर केला जाऊ शकतो. भविष्यात  बांबूच्या या भागापासूनही कार्बन क्रेडिटचा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. 

माहिती संदर्भ - अनुराधा काशिद (बांबू उत्पादक शेतकरी)

Web Title: Farmers can get carbon credit from rotting bamboo trunks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.