सांगली : जिल्ह्यात खासगी सावकारांकडून जादा दराने व्याज आकारणी करुन वसुली केल्याबद्दलच्या तब्बल ९२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. सावकारांकडे तारण असलेल्या पाच तक्रारदारांची ४ हेक्टर २४ आर जमीन परत मिळवून देण्यात जिल्हा उपनिबंधकांना यश आले आहे.
जादा व्याज आकारणीच्या ९२ तक्रारी तत्काळ निकालात काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत. तारण जमीन कर्ज फेडीनंतर ही दिली जात नसल्याबाबतच्या सात तक्रारी दाखल आहेत.
यापैकी पाच प्रकरणांमध्ये चार हेक्टर २४ गुंठे इतकी स्थावर मालमत्ता परत केली आहे. गरजू व्यावसायिक, नागरिक व शेतकरी यांनी परवाना घेतलेल्या सावकारांकडून कर्जाची रक्कम घ्यावी, असे आवाहन केले. पिळवणूक केल्यास पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे.
जिल्ह्यातून ९२ तक्रारी
• जिल्ह्यात खासगी सावकारांकडून जादा दराने व्याज आकारणी करुन वसुली केल्याबद्दलच्या तब्बल ९२ तक्रारी दाखल झाल्या आहेत.
• बेकायदेशीर व्याज वसुली प्रकरणी तक्रारी निकालात काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात नोंदणी केलेले ६१० सावकार
जिल्ह्यात ६१० परवानाधारक सावकर आहेत. या सावकारांना कर्ज दिल्यानंतर व्याज शेतकरी तारणावर ९ टक्के आणि विना तारण १५ टक्के व्याज दर तर बिगरशेतीसाठी तारणावर १५ टक्के आणि विना तारणावर १८ टक्के व्याज आकारणी करणे बंधनकारक आहे.
पाच शेतकऱ्यांना जमीन केली परत
सावकारांकडे तारण असलेल्या पाच तक्रारदारांची ४ हेक्टर २४ आर जमीन परत मिळवून देण्यात जिल्हा उपनिबंधकांना यश आले आहे. उर्वरित तक्रारींची चौकशी चालू असून सत्यता असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली.
सावकार किती व्याज घेऊ शकतात?
परवानाधारक सावकारांना कर्ज दिल्यानंतर व्याज शेतकरी तारणावर ९ टक्के आणि विना तारण १५ टक्के व्याज दर तर बिगरशेतीसाठी तारणावर १५ टक्के आणि विना तारणावर १८ टक्के व्याज आकारणी करणे बंधनकारक आहे. मात्र असे काही ठिकाणी होताना दिसत नाही.
जास्त व्याज घेत असेल तर तक्रार कोठे कराल?
परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असेल आणि तो सावकार जादा व्याज आकारणी करत असेल तर जिल्हा उपनिबंधक कार्यालय, तालुक्याच्या ठिकाणी सहायक निबंधक कार्यालय, पोलिस ठाण्यात संबंधित नागरिकांनी तक्रार करावी.
परवाना नसताना अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तीस सावकारी अधिनियमाचा कलम ३९ अन्वये पाच वर्षाचा कारावास व ५० हजार दंडाची तरतूद आहे. तरी सावकारांच्या जाचाने पीडित झालेल्या कर्जदारांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली अथवा संबंधित तालुक्याचे सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयाशी योग्य त्या पुराव्यानिशी संपर्क साधावा. दोषींवर कारवाई करण्यात येईल. - मंगेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक, सांगली