सध्या राज्यात अनेक ठिकाणी मॉन्सूनच्या पावसाचे आगमन होत असून हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पाऊसमान चांगले असणार आहे. या पार्श्वभूमीवर पेरण्यांनाही वेग आला आहे. राज्यात खरीप हंगामात कोकण, नाशिकचा पश्चिम पट्टा अशा ठिकाणी तृणधान्य अर्थातच भरडधान्य (Millet mission) लागवडीची लगबग असते. एक एकर भरडधान्य पेरणीचा खर्च अलीकडे १० ते १२ हजारापर्यंत पोहोचला आहे. अशा वेळी जर ३ हजाराचे प्रोत्साहन मिळाले, तर शेतकऱ्याला काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
शेतकऱ्यांना तृणधान्य किंवा भरडधान्य लागवडीसाठी प्रति एकर ३ हजार रुपये असे जास्तीत जास्त ५ एकर पर्यंत प्रोत्साहन मिळणार आहे. म्हणजेच १५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन मिळणार आहे. झारखंड राज्यातील सरकारने ही योजना आणली आहे. कृषी, पशुसंवर्धन आणि सहकार विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या झारखंड राज्य तृणधान्य अभियान योजनेंतर्गत क्षेत्राला दिला जाणार आहे.
या योजनेनुसार खरीप पीक वर्ष २४-२५ अंतर्गत, कृषी विभागाकडून तृणधान्यापैकी नाचणी, ज्वारी-बाजरी, सवा, कोडो या पिकांसाठी सर्व शेतकरी आणि बटाईदारांना प्रति एकर ३ हजार रुपये आणि ५ एकरसाठी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, आधार सीडिंग बॅक खाते, जमीन मालकीचे प्रमाणपत्र (महसूल पावती), प्रमुख, गावप्रमुख, महसूल कर्मचारी किंवा झोनल ऑफिसर यांनी दिलेला वंशावळी, खातेदार किंवा बटाईदार शेतकऱ्यांचा स्वघोषणा फॉर्म असणे आवश्यक आहे असणे अनिवार्य आहे. याशिवाय राज्याचा शेतकरी, कायम रहिवासी, वय किमान १८ वर्षे, किमान १० गुंठे आणि कमाल ५ एकर जमीन असणे आवश्यक आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या खरीप हंगामापासून कृषी विभागाने ही योजना सुरू केली आहे. त्याची नोंदणी करण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट आहे.