Join us

शेतकऱ्यांची कोंडी, रोजगार हमी योजनेच्या विहिरींना 'ती' अट मारक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 1:30 PM

भूजल मुल्यांकनानुसार४० ते ४५ गावांमध्ये रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक सिंचन विहीर घेण्यास मनाई आहे. केवळ समूह विहिरी घेण्यास अनुमती आहे. या अटीमुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

भूजल मुल्यांकनानुसार धाराशीव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील ४० ते ४५ गावांमध्ये रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक सिंचन विहीर घेण्यास मनाई आहे. केवळ समूह विहिरी घेण्यास अनुमती आहे. या अटीमुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडली जावी, यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप मडके यांनी ही अट रद्द करावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे केली होती.

प्रश्नाचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. सिंचन विहिरीचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून निकषांत सुधारणा करण्याच्या संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.

भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या निर्देशानुसार सेमी क्रिटीकल, क्रिटीकल आणि ओव्हर एक्स्प्लायटेड क्षेत्रात केवळ सामुहिक सिंचन विहीर घेता येते. वैयक्तिक विहीर घेण्यास बंदी आहे. अशा क्षेत्रात तालुक्यातील जवळपास ४० कळंब ते ४५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. सामुहिक विहिरी घेण्यास कोणी राजी होत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.

ही कोंडी फोडली जावी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदिप मडके यांनी ३ जुलै रोजी पालकमंत्री प्रा. डॉ. सावंत यांच्याकडे संबंधित अट रद्द करण्याची मागणी केली होती. याच पदत्राचा संदर्भ देत पालकमंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी ४ जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित नियमामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत संबंधित यंत्रणेला सूचना द्याव्यात, अशी विनंती केली आहे.

शेतकऱ्यांना रोहयोजून सिंचन विहिरीचा लाभ घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीचा संदर्भ देत त्यांनीही लागलीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून सिंचन विहिरीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याबाबत संबंधित यंत्रणेला आदेशित करण्याची विनंती केली आहे. प्रश्न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे. - संदीप मंडके, माजी सदस्य, जिल्हा परिषद. 

हेही वाचा - सावधान ! फळांसोबत पोटात जात आहेत घातक रसायने

टॅग्स :सरकारी योजनाशेतकरीशेतीशेती क्षेत्रपाणीमराठवाडा