Join us

After Harvesting : शेतकऱ्यांनो! पीक काढल्यावर लावू नका 'काडी'; वनसंपदा होतोय नष्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 14:55 IST

After Harvesting : शेतात तसेच शेताच्या धुऱ्यावर कचरा जाळण्याचे प्रकार वाढल्यामुळे प्रदूषणात सतत वाढ होत आहे. यामुळे धुऱ्यावरील झाडेही पेट घेत असून, वनसंपदा (forest) नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. (After Harvesting) वाचा सविस्तर

सागर कुटे

शेतात तसेच शेताच्या धुऱ्यावर कचरा जाळण्याचे प्रकार वाढल्यामुळे प्रदूषणात सतत वाढ होत आहे. यामुळे धुऱ्यावरील झाडेही पेट घेत असून, वनसंपदा (forest) नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.  (After Harvesting) 

पीक कापणी झाल्यानंतर शेतकरी शेतातच कचरा जाळतात.  त्यामुळे शेतातील पीक काढल्यावर (After Harvesting) 'काडी' लावू नका, असा सल्ला प्रशासनाच्या वतीने दिल्या जात आहे.

शेतकऱ्यांच्या मते, कचऱ्याचे योग्यरीत्या व्यवस्थापन होत नसल्याने आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जात नसल्याने त्यांना नाईलाजाने कचरा जाळावा लागत आहे. (After Harvesting)

यावर्षी खामगाव शहरात गेल्यावर्षीच्या तुलनेत कचरा जाळण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणात सातत्याने वाढ होत असल्याने उत्तर प्रदेश सरकारने अशा प्रकारच्या घटनांना रोखण्यासाठी कठोर निर्णय घेतले आहेत. (After Harvesting)

२ ते ५ हेक्टरवर पिकाचा कचरा जाळल्यास उत्तर प्रदेशमध्ये पाच हजार दंडाची तरतूद आहे. मात्र महाराष्ट्रात अशा प्रकारची कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे शेतात काडी कचरा जाळण्याच्या प्रमाणात वाढ झाली. (After Harvesting)

वनसंपदाही होते नष्ट!

कचरा पेटविल्यामुळे धुऱ्यावरील मोठमोठी झाडेही पेट घेतात. सोबतच काडी कचऱ्यासोबतच वनसंपदाही (forest) नष्ट होते, तसेच कीटक आणि पक्ष्यांनाही याचा धोका पोहोचतो. वन्यजीवांचेही मोठे नुकसान यात होते. त्यामुळे धुऱ्यावरील कचरा जाळण्याला पक्षीमित्र तथा पर्यावरण रक्षकांचा विरोध असतो. (After Harvesting) 

प्रदूषण नियंत्रणासाठी नागरिकांची भूमिका

प्रदूषणाच्या वाढत्या संकटामुळे नागरिकांच्या मनात जागरूकतेची आवश्यकता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी कचरा जाळण्याऐवजी त्याचा योग्यप्रकारे निपटारा करावा, यासाठी प्रशासनाने नागरिकांना जागरूक करणे आवश्यक आहे. तसेच, शेतकऱ्यांसाठी पर्यावरणपूरक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. (After Harvesting)

कचरा पेटविणाऱ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष!

* हरित लवादाकडून मनाई असतानाही मोठ्या प्रमाणात कचरा पेटविला जात आहे. शहरी, ग्रामीण भागासोबतच शेतातही कचरा पेटविण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. मात्र याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.

* एखादा शेतकरी पकडला आणि एक हेक्टरपर्यंत पीक जाळताना आढळून आला तर अडीच हजार रुपये, तर २ ते ५ हेक्टरवर पिकाचा कचरा जाळल्यास पाच हजार दंडाची तरतूद केली आहे.

* पाच हेक्टरपेक्षा अधिक कचरा जाळल्यानंतर पंधरा हजार रुपयांपेक्षा अधिक दंड आकारला जाणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Gram Panchayat : जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायती झाल्या मालामाल जाणून घ्या काय आहे कारण

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीवनविभाग