Lokmat Agro >शेतशिवार > शेतकऱ्यांनो ५० टक्के सवलतीनं घ्या नांगर, इंजिन, ताडपत्री, कडबाकुट्टी व शेत औजारे

शेतकऱ्यांनो ५० टक्के सवलतीनं घ्या नांगर, इंजिन, ताडपत्री, कडबाकुट्टी व शेत औजारे

Farmers get 50% subsidy on plough, engine, tarpaulin, chaff cutter and farm implements | शेतकऱ्यांनो ५० टक्के सवलतीनं घ्या नांगर, इंजिन, ताडपत्री, कडबाकुट्टी व शेत औजारे

शेतकऱ्यांनो ५० टक्के सवलतीनं घ्या नांगर, इंजिन, ताडपत्री, कडबाकुट्टी व शेत औजारे

जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना पीक संरक्षण औजारे व उपकरणे, ट्रॅक्टर चलित औजारे, कृषी सिंचनासाठी सुधारित औजारे साधने ५० टक्के मर्यादित अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना पीक संरक्षण औजारे व उपकरणे, ट्रॅक्टर चलित औजारे, कृषी सिंचनासाठी सुधारित औजारे साधने ५० टक्के मर्यादित अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूर : जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना पीक संरक्षण औजारे व उपकरणे, ट्रॅक्टर चलित औजारे, कृषी सिंचनासाठी सुधारित औजारे साधने ५० टक्के मर्यादित अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहेत.

यासाठी शेतकऱ्यांनी ६ ऑगस्ट २०२४ पर्यंत पंचायत समिती स्तरावर अर्ज करण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी नंदकुमार पाचकुडवे यांनी केले आहे. या योजनेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अत्यल्पभूधारक व महिला शेतकरी

यांना प्राधान्य राहील. दरम्यान, कृषी योजनांचा फायदा घेणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांनी स्वतःचा सातबारा, आठ अ, आधारकार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, तसेच लाभार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे असल्यास जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांग लाभार्थीसाठी दिव्यांगत्वाच्या दाखल्याची झेरॉक्स प्रतीसह संबंधित पंचायत समितीकडे अर्ज करावेत.

लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून आपल्या पसंतीची अवजारे खरेदी करावी लागतील.

खरेदी करावयाची अवजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी परीक्षण करून ती बीआयएस अथवा अन्य संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार, तांत्रिक निकषानुसार असावीत, असेही जिल्हा परिषदेने शेतकऱ्यांना आवाहन करताना कळविले आहे.

५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी
औजारांसाठी जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लक्ष्यांकानुसार सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. मंजूर औजारांचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे अदा करण्यात येईल. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विकास अधिकारी पाचकुडवे यांनी केले आहे.

सेस फंडातून योजनांसाठी खर्च
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शेतकऱ्यांसाठी पिस्टन स्प्रे पंप, नॅपसॅक बॅटरी ऑपरेटेड स्प्रेपंप, ब्रश कटर, सोलार इन्सेंक्ट ट्रॅप. रोटाव्हेटर, पल्टी नांगर, रोटरी टिलर व विडर, पेरणी यंत्र, कल्टी व्हेटर, ५ एच पी सबमर्सिबल पंपसंच, डिझेल इंजिन, कडबाकुट्टी, ताडपत्री, स्लरी इत्यादी साधने ५० टक्के मर्यादित अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहेत.

अधिक वाचा: Ladli Behna Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळण्यासाठी केले हे मोठे बदल

Web Title: Farmers get 50% subsidy on plough, engine, tarpaulin, chaff cutter and farm implements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.