Lokmat Agro >शेतशिवार > शेतकऱ्यांना टोमॅटोमधून मिळाले लाखोंचे उत्पन्न

शेतकऱ्यांना टोमॅटोमधून मिळाले लाखोंचे उत्पन्न

Farmers got income of lakhs from tomatoes | शेतकऱ्यांना टोमॅटोमधून मिळाले लाखोंचे उत्पन्न

शेतकऱ्यांना टोमॅटोमधून मिळाले लाखोंचे उत्पन्न

भाव नसल्याने टोमॅटो रस्त्यावर शेतकऱ्यांनी फेकल्याचे आपण ऐकले आहे; परंतु प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या टोमॅटो पिकाला चांगला भाव मिळाला असून ...

भाव नसल्याने टोमॅटो रस्त्यावर शेतकऱ्यांनी फेकल्याचे आपण ऐकले आहे; परंतु प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या टोमॅटो पिकाला चांगला भाव मिळाला असून ...

शेअर :

Join us
Join usNext

भाव नसल्याने टोमॅटो रस्त्यावर शेतकऱ्यांनी फेकल्याचे आपण ऐकले आहे; परंतु प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या टोमॅटो पिकाला चांगला भाव मिळाला असून मांजरेवाडी (ता खेड) येथील अरविंद मांजरे या शेतकऱ्याने पिकविलेल्या टोमॅटोला आतापर्यंत १५०० क्रेटमधून १५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

एप्रिल, मे महिन्यात लागवड केलेले टोमॅटो बहुतेक वेळा करपा व इतर रोगांनी नष्ट होतात. या संकटांवर मात करून खेड तालुक्यातील मांजरेवाडी (धर्म) येथील शेतकरी अरविंद मांजरे यांनी एक एकरावर टोमॅटोची लागवड केली. त्यावेळी टोमॅटो दोन-तीन रुपये किलोने विकले जात होते. पुढील भावाचा विचार न करता या शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. सुरुवातीला कमी भाव मिळाला पण नंतर मात्र त्यांचे नशीब न फळाला आले. एक एकरात टोमॅटोला दीड लाखापर्यंत खर्च केलेला  असताना आजपर्यंत त्यांना एक एकर टोमॅटोतून १५ लाखांचे उत्पन्न मिळाले. भाव वाढत जाऊन दोन हजार रुपये क्रेटपर्यंत मिळाला. आतापर्यंत पंधराशे क्रेटचे उत्पादन निघाले.

शेतकऱ्यांना नशिबाची साथ

दोन महिन्यांपूर्वी भाजीपाल्यातून शेतकयांचा खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकन्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला, तर काही शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांना फाटा देऊन शांत बसणे पसंत केले. काही शेतकऱ्यांनी पुढील भाजीपाला पिकांच्या बाजारभावाचा विचार न करता भाजीपाला पिके घेतली. त्यांना नशिबाने साथ दिली आणि आज ते लखपती झाले आहेत.

सुरुवातीला एप्रिल महिन्यात टोमॅटोची लागवड केली त्यावेळेस उन्हाचा कडाका यातून टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणात खर्च करून वाढविले. त्यावेळेस किंचित शेतकऱ्यानी लागवड केलेली होती, परंतु पुढचा बाजारभावाचा विचार करता टोमॅटो पीक घेण्याचा निर्णय घेतला आणि आज मात्र त्याच टोमॅटो पिकाने चार पैसे पदरात पाडून दिले आहे. -अरविंद मांजरे, (शेतकरी, मांजरेवाडी, ता. खेड)

Web Title: Farmers got income of lakhs from tomatoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.