राज्यात कुठे भरघोस पाऊस (Rain) आहे. तर कुठे शेतक-यांना आजही चांगल्या पावसाची प्रतीक्षा असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते आहे. पाण्यासाठी भर उन्हाळयात वणवण भटकून पाणी घ्यावे लागले.आता भरपावसाळयातही तेच चित्र कायम असल्याची परिस्थिती आहे. यंदा दीड महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे चार तालुक्यांतील २७२ गावांची तहान ३५५ टँकरद्वारे भागवली जात आहे.पावसाळा सुरू होऊन दीड महिना होऊन गेला तरी अजुनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. छत्रपती संभाजीनगर, पैठण तालुक्यातील शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले आहे. गेल्यावर्षी पावसाने सरासरी गाठली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात जिल्ह्यातील बहुतांशी जलस्रोत लवकरच आटले होते. त्यामुळे आता तरी पावसाने दडी मारू नये. यंदा तरी समाधानकारक पावस व्हावा, अशी आस शेतक-यांना आहे.
'मे'मध्ये सुरू होते ७२५ टँकरमागील दोन महिन्यांपूर्वी अर्थात मे महिन्यात जिल्ह्यातील ४६६ गावे आणि ७२ वाड्यांना ७२५ टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात होता.यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ७९ गावे आणि २३ वाड्या, फुलंब्री- ५७ गावे आणि १ वाडी, पैठण ६५ गावे, १९ वाड्या, वैजापूर- ९९ गावे आणि १२ वाड्या, गंगापूर- ८१ गावे आणि ९ वाड्या, खुलताबाद- ९ गावे, कन्नड ३० गावे आणि १ वाडी, सिल्लोड- ४५ गावे आणि ७ वाड्या आणि सोयगाव तालुक्यातील १ गावाचा समावेश होता.गंगापूर आणि वैजापूर या चार तालुक्यांत भूगर्भातील पाणी पातळी वाढलेली नाही. त्यामुळे प्रशासनापुढे या चार तालुक्यांतील २७२ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याशिवाय मार्ग उरलेला नाही. सध्या छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ४३ गावे आणि १७ वाड्या, पैठण तालुक्यात ३८ गावे आणि १० वाड्या, वैजापूर तालुक्यातील ६८ गावे आणि ८ वाड्या आणि गंगापूर तालुक्यातील ८८ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
अधिग्रहण केलेल्या २५४ विहिरींची कपातटंचाईग्रस्त गावांसाठी प्रशासनाने मे महिन्यात ४०० विहिरींचे अधिग्रहण केले होते. त्यातून अलीकडे २५४ अधिग्रहित विहिरींची कपात करण्यात आली आहे.सध्या अधिग्रहण केलेल्या १४६ विहिरींच्या माध्यमातूनच चार तालुक्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या तुरळक पावसाने का होईना फुलंब्री, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, आणि सोयगाव या पाच तालुक्यांतील जलस्रोतांची पाणीपातळी वाढल्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला असून तेथील टँकर बंद करण्यात आले आहेत.