Lokmat Agro >शेतशिवार > सातारा जिल्ह्यात शेतकरी आंबा, डाळिंब अन् द्राक्ष बागांमधून मालामाल

सातारा जिल्ह्यात शेतकरी आंबा, डाळिंब अन् द्राक्ष बागांमधून मालामाल

Farmers in Satara district produce mangoes, pomegranates and grapes got good income | सातारा जिल्ह्यात शेतकरी आंबा, डाळिंब अन् द्राक्ष बागांमधून मालामाल

सातारा जिल्ह्यात शेतकरी आंबा, डाळिंब अन् द्राक्ष बागांमधून मालामाल

सातारा जिल्ह्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून, शेतकरीही मालामाल होत आहेत. विशेष करून आंबा, डाळिंब आणि द्राक्ष बागांतून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत.

सातारा जिल्ह्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून, शेतकरीही मालामाल होत आहेत. विशेष करून आंबा, डाळिंब आणि द्राक्ष बागांतून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

सातारा : सातारा जिल्ह्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून, शेतकरीही मालामाल होत आहेत. विशेष करून आंबा, डाळिंब आणि द्राक्ष बागांतून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत, तर जिल्ह्यात सध्या विविध प्रकारची ३० फळपिके घेण्यात येत आहेत.

यामध्ये सीताफळ, चिकू, चिंच, जांभूळ, ड्रॅगनफ्रूट, पेरू, नारळ आदींचा समावेश आहे, तर गेल्या वर्षभरात जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत ७२१ हेक्टरवर नवीन फळबाग लागवड झालेली आहे. फळबागांमधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळत आहे.

विकत पाणी आणून बागा जगविल्या
माण तालुक्यातील भाटकी येथील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीपासून दुष्काळ असतानाही डाळिंबातून उच्चांकी उत्पादन घेतले आहे. डाळिंबासाठी टँकरने विकत पाणी आणून बागा जगविल्या, तसेच फळधारणेनंतरही बागेचे व्यवस्थित संगोपन केले. त्यामुळे एक ते दोन एकर बागेतूनही शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे उत्पादन घेतल्याचे दिसून आले आहे.

विदेशातही निर्यात
जिल्ह्याच्या पूर्व भागात डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. येथील अनेक शेतकरी हे उच्च दर्जाचे डाळिंब उत्पादन घेत आहेत. त्यामुळे येथील डाळिंबाची आयात, तसेच युरोपातही निर्यात होत आहे. या डाळिंबाला चांगला दर मिळतो. त्यातून शेतकऱ्यांनाही चांगले पैसे मिळत आहेत, तसेच देशांतर्गत बाजारपेठेतही या डाळिंबाला मागणी कायम असते.

आंब्याचे क्षेत्र वाढू लागले
जिल्ह्यातील दुष्काळी भागात द्राक्षे आणि डाळिंबाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. या भागातील हवामान अनुकूल असल्याने शेतकरी फळबागा घेत आहेत, तसेच येथील डाळिंब आणि द्राक्षे यांची परदेशातही निर्यात होत आहे; पण सध्या आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मागील वर्षभरात रोजगार हमी योजनेअंतर्गत आंब्याची ४९१ हेक्टरवर लागवड झाली आहे. सातारा, कोरेगाव, वाई, जावळी या तालुक्यात सर्वाधिक लागवड आहे, तसेच स्थानिक बाजारपेठेत हा आंबा उपलब्ध होत आहे.

फळबाग लागवड किती? क्षेत्र हेक्टरमध्ये (वर्ष २०२३-२४)
आंबा - ४११
पेरू - ३०
डाळिंब - ४०
लिंबू - १२
नारळ - ८७ 
जांभूळ - ०७ 
केळी - ११

अधिक वाचा: Mango Varieties: आंबा लागवड करताय? कोणत्या जातीची निवड कराल

Web Title: Farmers in Satara district produce mangoes, pomegranates and grapes got good income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.