Join us

केव्हिके बदनापूरद्वारे विशेष कापुस प्रकल्प अंतर्गत शेतकरी मेळावा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 20:43 IST

KVK Badnapur Jalna : भा.कृ.अनु.प.केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपुर, भा.कृ.अनु.प. अटारी पुणे आणि व.ना.म.कृ.वि परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कापूस प्रकल्प २०२४-२५ अंतर्गत गुरुवार (दि.०९) रोजी वाल्हा (ता. बदनापूर) येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

जालना : भा.कृ.अनु.प.केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपुर, भा.कृ.अनु.प. अटारी पुणे आणि व.ना.म.कृ.वि परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कापूस प्रकल्प २०२४-२५ अंतर्गत गुरुवार (दि.०९) रोजी वाल्हा (ता. बदनापूर) येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व.ना.म.कृ.वि परभणीचे कुलगुरु डॉ. इंद्र मनी मिश्रा होते. तसेच विशेष अतिथी म्हणून संचालक विस्तार शिक्षण डॉ. जी. एम. वाघमारे, संचालक संशोधन डॉ. के. एस. बेग, विशेष कापूस प्रकल्पचे मुख्य नोडल अधिकारी डॉ. ए. एस. तायडे, जालना नोडल अधिकारी डॉ. सुनील महाजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगरचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार, कृषी महाविद्यालय बदनापूरचे प्राचार्य डॉ. आर. डी. अहिरे, कृसंकें बदनापूरचे तूर पैदासकार डॉ. डी. के. पाटील आणि कंडारी (बु.) सरपंच राजेंद्र फटाले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला कृविकें बदनापूरद्वारे कापूस पऱ्हाटी कुट्टी यंत्र आणि कापूस पिकावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर तयार करण्यात आलेले दोन हस्तपत्रिकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर.

यासोबत ज्या प्रगतीशील शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने सन्मानित करुन जालना जिल्हाच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा रोवला आहे असे पांडुरंग निवृत्ती डोंगरे, रामदास शेषराव बारगजे, सुचिता दत्तात्रय शिनगारे, रामेश्वर भगवान उबाळे, श्रीकृष्ण नामदेव डोंगरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये विशेष कापूस प्रकल्प अंतर्गत सर्वात जास्त उत्पादन घेणाऱ्या श्रवण मारोती सुसर, सोमीनाथ सुधाकर अवघड, जयराम गोविंद लाखे, कृष्णा सुदाराम कान्हेरे, अशोक प्रल्हाद चव्हाण, अशोक विठोबा शिरसाठ आणि कविता मनोज एखंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

युवा प्रगतीशील शेतकरी अजिंक्य सिनगारे मौजे कंडारी (बु.) यांनी वर्ष २०२४-२५ मध्ये कृविकें द्वारे समूह आध्यरेषीय पिक प्रात्यक्षिक (कडधान्य) अंतर्गत १७ एकर वरती तूर (वाण – गोदावरी बी.डी.एन-२०१३-४१) पिकाची लागवड केली होती. सोबतच कृविकेंच्या तांत्रिक सहाय्याने आणि आत्मा जालना यांच्या आर्थिक मदतीने अजिंक्य पाटील अग्रो प्रोडक्ट् शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अन्नधान्य सफाई व प्रतवारी केंद्राची उभारणी करुन युवा वर्गात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करीत असल्याने मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

व.ना.म.कृ.वि परभणीचे सन्मानीय संचालक विस्तार शिक्षण डॉ. जी. एम. वाघमारे यांनी सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ आणि वर्ष २०२३-२४ मध्ये कृविकें द्वारे केलेल्या विविध विस्तार कामाचा आढावा मांडला.

तसेच जालना जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन, अंबड आणि जाफराबाद असे एकूण चार तालुक्यात १३०.६ हेक्टर वरती २१७ शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर कापूस पिकाची सघन (३ x १ फुट) आणि अतिघन (३ x ०.५ फुट) पद्धतीने लागवड करण्यात आली होती. सर्व साधारणपणे प्रत्येक शेतकऱ्याला १३ ते १७ क्विंटल प्रती एकर एवढे उत्पादन झाले आहे. शिवाय काही शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञाना चा शास्त्रोक्त पद्धतीने अवलंब करुन एकरी २० ते २१ क्विंटल उत्पन्न काढले आहे यांची माहिती दिली. 

तर डॉ. ए. एस. तायडे आणि डॉ. सुनील महाजन यांनी कापूस पिकाची सघन आणि अतिघन लागवड तंत्रज्ञान बाबत सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले. जालना जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सन्मानीय जी. आर. कापसे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना काळानुरूप शेतीत अधिक यांत्रिकीकरण होणे आवश्यक आहे आणि सोबतच उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याबाबत सुद्धा संशोधन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात व.ना.म.कृ.वि परभणीचे सन्मानीय कुलगुरु डॉ. इंद्र मनी मिश्रा यांनी सांगितले की सध्या शेतीमध्ये भेडसावत असलेल्या कमी मनुष्यबळ अभावी कामे करणे अडचणीचे जात असल्याने यांत्रिकीकरणाकडे जाने गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच व.ना.म.कृ.वि परभणी करिता नेहमीच शेतकरी देवो भव: या सकारात्मक दृष्टीने काम करत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. आर. एल. कदम यांनी तर कृषी विज्ञान केंद्र बदनापूरचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. डी. सोमवंशी यांनी सदरील कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्र बदनापूर येथील अधिकारी, कर्मचारी आणि विशेष कापूस प्रकल्प अंतर्गत काम पाहणारे ए. पी. डाके, ए. एस. बनसोडे आणि ए. एस. दाभाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

हेही वाचा : Women Farmer Success Story : बचत गटातून रुपाली ताईनी घेतली उभारी; मराठवाड्याच्या यशस्वी उद्योजिकेची कहाणी यथार्थकारी

टॅग्स :जालनाशेती क्षेत्रशेतकरीशेतीकापूसवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ