नाशिक जिल्ह्यातील सुमारे ६५ हजार कर्जधारक शेतकऱ्यांना थकीत कर्जप्रकरणी नाशिक जिल्हा सहकारी बँकेने जमीन लिलावाच्या नोटीसा काढल्या असून यासंदर्भात शेतकरी समन्वय समितीचे धरणे आंदोलन सुरू आहे. दरम्यान आज दिनांक ७ ऑगस्ट २३, सोमवारी, मौजे शिरसगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील शेतकरी श्री सूर्यभान पंढरीनाथ मोरे, राजेंद्र दत्तात्रय मोरे, संजय शिवाजी मोरे, वसंत विठ्ठल आहेर, या चार शेतकरी भावांचा शेतीचा लिलाव नाशिक जिल्हा सहकारी बँकने जाहीर केला होता तो शेतकऱ्यांनी एकत्र येत हाणून पाडला.
दि. ३ ऑगस्ट २३ ला जयराम सुखदेव मोरे, या शेतकऱ्यांच्या शेतीचा लिलाव झाला होता. त्यावर चर्चा करण्यात आली, व तसेच मौजे शिरसगाव या ठिकाणी तलाठी, महसूल अधिकारी, बँकेचे अधिकारी, ग्रामसेवक, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष श्री साहेबराव गणपत मोरे, तसेच ग्रामपंचायत सरपंच श्री रवींद्र शिरसाठ, यांच्या उपस्थितीत सर्व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वरील शेतकऱ्यांचा शेतीचा लिलाव बंद पाडला.
यावेळी शेतकरी नेते धनंजय पाटील काकडे, अमरावती (महाराष्ट्र ), शेतकरी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे नाशिक, शेतकरी संघर्ष संघटनेचे सुधाकरराव मोगल निफाड, नेत्यांनी शेतकरी विरोधी कायदे व लिलाव होणाऱ्या शेतीचे कायदे व इतर माहिती , व पुढील शेतकरी व्यवस्थेसाठी संघर्ष करण्याची भूमिका उपस्थितांना समजावून सांगितली. या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष निवृत्ती गारे पाटील, अक्षय मोरे उमेश मोरे, सुरेश मोरे पुंडलिक आव्हाड, भाऊसाहेब तासकर, रामदास आहेर, राजेंद्र मोरे, अण्णासाहेब मोरे, संजय मोरे, गिरीश जाधव, अनिल मोरे, शंकर भडांगे ,प्रकाश कराटे, शांताराम मोरे, शिवाजी मोरे, सागर मोरे आदी शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.