मागच्या महिनाभरापासून वसमत व परिसरातील अनेक शेत शिवारात ऊस काढणीला सुरुवात झाली आहे. ६० टक्के जवळपास शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याला नेवून दिला आहे. त्यामुळे उसाच्या शेतात गहू व सूर्यफूल पेरा घेण्यासाठी शेतकरी मशागत करू लागले आहेत.
यावर्षी पावसाचे प्रमाण तसे कमीच राहिले. परंतु, विहिरींना पाणी भरपूर आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली होती. महिनाभरापासून शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यांना नेणे सुरू केले आहे. ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांनी उसाची तोड केली असून, गहू व सूर्यफूल पेरण्यासाठी शेतीची मशागत करणे सुरू केले आहे. उसाच्या शेतात गहू सूर्यफूल हे पीक घेतले तर ते पीट चांगले येते, असे सांगितले जाव त्यामुळे तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव दाभडी, सोमठाणा, पार्टी (बा.), कवठ परजना आदी भागातील शेतक- सूर्यफूल व गहू पिकांचा पेन घेण्यासाठी रात्रंदिवस उसाच्या शेतीच मशागत करू लागले आहेत.
गहू पेरणीसाठी कोणते वाण निवडाल?
गहू हे जगातील एक प्रमुख अन्नधान्याचे पीक असून त्याच्या लागवडीचे क्षेत्र व उत्पादन इतर अन्नधान्यांच्या पिकापेक्षा अधिक आहे. जगातील निम्या लोकांच्या पोषणात गव्हाला प्रमुख स्थान आहे. त्यापासून चपाती, पाव व तत्सम पदार्थ, रवा व मैदा हे पदार्थ तयार करता येतात. गहू विशेषत: उत्तर आणि दक्षिण समशितोष्ण कटिबंधातील प्रदेशांत पिकतो. जगातील पेरणीसाठी गव्हाच्या सुधारित वाणांचा वापर झाल्यामुळे तसेच मशागतीच्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे महाराष्ट्राचे गव्हाचे सरासरी प्रतिहेक्टरी उत्पादन ४८२ किलोवरुन १८३९ किलोपर्यंत वाढले आहे.