अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता ग्रामीण भागात ज्वारी सोंगणी व काढणीची कामे सुरु आहेत. त्यातच वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकरी धास्तावले असून, कामे उरकण्यासाठी धावपळ करीत आहेत.
यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच धरसोड केली. त्यामुळे खरीप हंगाम तसाच गेला. तर रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा या पिकांना पाणी कमी लागते.
मजूर पुन्हा खातोय भाव
गहू, ज्वारी, हरभरा काढताना अनेकांना मजुरांची गरज भासत आहे. सगळीकडे मागणी असल्याने सध्या मजुरांनी आपले रोजंदारी दर वाढवले असून, मजूर पुन्हा भाव खात असल्याचे गावागावांत दिसत आहे.
म्हणून शेतकऱ्यांनी या पिकांना पसंती दिली. मात्र, अशातच अवकाळीने हजेरी लावली. ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला जाण्याच्या भीतीने धास्तावले आहेत.
गारपिटीच्या धास्तीने प्रत्येक शेतकऱ्याला आपली ज्वारी वेळेत घरी गेली पाहिजे, असे वाटते. त्यामुळे सर्वजण एकदाच मळणी यंत्रचालकांच्या मागे लागले आहेत. परिणामी मळणी यंत्रचालकांची लगीनघाई सुरू आहे. विशेष म्हणजे रात्रंदिवस मळणी यंत्राचे काम सुरु असल्याचे परिसरात दिसत आहे.