सध्या सर्वत्र शेती मशागतीचे कामे सुरू आहे. पारंपरिक बैलांच्या मदतीने तर काही ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही कामे होत आहे. मात्र ही कामे सुरू असतांना शेतकरी बांधवांनी वेळोवेळी काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून संभाव्य आर्थिक हानी तसेच मोठा अपघात यामुळे टळू शकतो.
जवळपास सर्वच शेतकर्यांच्या शेतात विहीरी व शेततले असतात. तसेच यासाठी तारांच्या किंवा केबल वायरांच्या मदतीने विद्युत प्रवाह पुरवला जातो. अनेकदा या वायरांच्या व तारांच्या संपर्कात आल्याने शेतकरी तसेच गुरे दगावल्याची अनेक उदाहरणे विविध भागात घडलेली आहे. तेव्हा अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रत्येक शेतकर्याने काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
शेतात काम करतांना जर आपल्या आजुबाजुने वायर किंवा विद्युत तारा गेलेल्या असतील तर काय काळजी घेणे गरजेचे आहे जाणून घेऊया.
• शेतातून केबल ओढलेले असेल तर त्यातील विद्युत प्रवाह बंद करावा.
• तार, विजेचा खांब असेल तर त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे.
• महावितरणला अर्ज करून वाकलेले विद्युत खांब दुरुस्त करण्यास सांगावे.
• पाऊस सुरू असताना विद्युत प्रवाहाच्या परिसरातील शेतात काम करणे टाळावे.
• शेतात जमिनीवर केबल पसरलेले असेल तर त्यात कट झाले असल्यास वेळीच त्याला कवच आवर्तन द्यावे.
• अती खराब अवस्थेत वायर असेल तर ते बदलून घ्यावे.
• बैलांच्या सहाय्याने मशागत सुरू असल्यास त्यावेळी खांब, वायर यापासून सुरक्षित अंतर ठेवून मशागत करावी.
• विहरीवरील मोटार संच चालू अथवा बंद करतांना कोरड्या काडीचा वापर करावा हात लावणे टाळावे.
हेही वाचा - गूळ शेंगदाणे नियमित सेवन केल्यास अॅसिडिटीपासून होते सुटका; हाडेही होतात मजबूत