शेतीला केवळ रात्री वीजपुरवठा होत असल्याने हवालदिल झालेल्या केज विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना लवकरच - दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री सौर - कृषीवाहिनी योजनेंतर्गत - मतदारसंघातील अकरा विद्युत उपकेंद्रातून आता शेतीपंपासाठी दिवसाही वीजपुरवठा केला जाणार आहे.
मतदारसंघातील अधिकाधिक - उपकेंद्रांचा समावेश या योजनेत - करण्यासाठी आ. नमिता अक्षय मुंदड यांनी नियमित पाठपुरावा सुरू ठेवला होता. ही योजना सुरू झाल्यास केज विधानसभा मतदारसंघातील बीड, अंबाजोगाई, केज तालुक्यातील गावांना लाभ होणार आहे.
सध्या शेतीला रात्री वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर, शेतीला दिवसा किमान आठ तास वीज देण्यासाठी सरकारने यानिमित्ताने शेतकऱ्यांची पिकांना पाणी देण्यासाठीची मोठी अडचण आता दूर होणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेची सुरुवात केली.
याद्वारे सौरऊर्जेद्वारे निर्मिली जाणारी वीज शेतीला दिवसा आठ तास देण्यासाठी उपयोगात आणली जाणार आहे. योजनेचा व्यापक उद्देश लक्षात घेता आ. मुंदडा यांनी ही योजना केज विधानसभा मतदारसंघातील अधिकाधिक उपकेंद्राद्वारे सुरू करावी, अशी मागणी लावून धरली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून योजनेतून मतदारसंघातील कृषिबहुल भागातील अकरा विद्युत उपकेंद्रातून शेती पंपासाठी वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सौरऊर्जेचा होणार वापर
■ या योजनेत केज मतदारसंघातील वाघेबाभूळगाव, मस्साजोग, उमरी, राजेगाव, नांदूरघाट, मांडवा पठाण, विडा, हनुमंत पिंपरी, बनसारोळा, माळेगाव, देवगाव या अकरा उपकेंद्रांचा समावेश आहे.
■ या उपकेंद्रातून अतिरिक्त पाच एमव्हीचे रोहित्र बसविले जाणार असून सौरऊर्जेचा वापर करून शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात येईल. लवकरच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
उर्वरित उपकेंद्रासाठीही प्रयत्न सुरू
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीपंपाला दिवस वीजपुरवठा देण्यासाठी केलेला संकल्प आता पूर्णत्वास जात आहे. मतदारसंघातील उर्वरित ३३ केव्ही उपकेंद्रातूनही योजना सुरू करण्याच्या दृष्टीने सौर पॅनल बसवण्यासाठी जागा उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू आहेत. जागा उपलब्ध होताच त्या-त्या उपकेंद्रात सौरऊर्जेसाठी अतिरिक्त पाच एमव्हीचे रोहित्र बसवून दिवसा शेतीपंपासाठी विद्युत पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.- नमिता मुंदडा, आमदार, केज विधानसभा मतदारसंघ