Join us

शेतकऱ्यांना पुन्हा गुळ निर्मितीकडे वळावे लागणार, साखर हंगाम ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 10:18 AM

गुऱ्हाळघरांना घरघर, ऊसदराच्या वादामुळे कारखानेही बंद,

राजाराम लोंढे

साखर कारखान्यांचा हंगाम ठप्प असला तरी गुन्हाळघरेही संथ गतीनेच सुरू आहेत. गुळाचा उत्पादन खर्च आणि मिळणारा दर याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांनी गूळ उत्पादनासाठी हात आखडता घेतला आहे. त्यात साखर कारखान्यांनी प्रतिटन ३२०० रुपये दर जाहीर केल्याने त्याचा परिणामही गुन्हाळघरांवर झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गुळाचा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख असली तरी अलिकडील दहा वर्षात येथील गुन्हाळ घरांना घरघर लागली आहे. जिल्ह्यात जेमतेम २०० गुन्हाळ घरे सुरू असतील. साखर कारखान्यांची संख्या वाढली, हे जरी प्रमुख कारण असले तरी बारमाही साखर मिश्रित गूळ उत्पादन हेही कारणीभूत आहे.

यंदा ऊस दराच्या आंदोलनामुळे साखर कारखान्यांचा हंगाम अद्याप सुरू नाही. परतीचा पाऊसही नसल्याने यंदा ऑक्टोबरपासूनच जिल्ह्यातील गुन्हाळ घरे सुरू झाली आहेत. हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरी अपेक्षित आवक बाजार समितीत दिसत नाही.

वास्तविक कारखाने बंद असल्याने शेतकऱ्यांनी गुन्हाळ घरांना ऊस पाठवणे पसंत करणे अपेक्षित होते, पण तसे होताना दिसत नाही. गुळाचा उत्पादन खर्च व मिळणारा दर याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांनी शिवारातच ऊस ठेवणे पसंत केले आहे.

हंगामापेक्षा बिगर हंगामातच गूळ अधिक

एप्रिल ते २२ नोव्हेंबर २०२३ पर्यंत बाजार समितीत ८ लाख ८३ हजार गूळ व्यांची आवक झाली आहे. पण यातील सर्वाधिक आवक ही बिगर हंगामातच झालेली आहे.

कारखान्याला ऊस पाठवणे फायदेशीर कसा...

कारखान्याकडून एक टनाला मिळणारे पैसे किमान - ३२०० रुपयेएक टनापासून तयार होणारा गुळ- १२० किलो

सरासरी ४ हजार रुपये दराने होणारी रक्कम  ४८०० रुपयेगुहाळभाडे, ऊस तोडणी-ओढणीसह इतर खर्च  किमान १३०० रुपये बाजार समितीपर्यंत वाहतूक भाडे- २४० रुपयेहमाल-तोलाई व इतर - ४८० रुपये

एकूण खर्च - २ हजार रुपये

दराचा विषय लटकल्यानं ऊस गाळप थंडावली

आवक कमी होण्यामागे

आवक कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. शेतकऱ्यांची रसापासूनच गुळाची निर्मिती करायला पाहिजे, तरच कोल्हापूरी गुळ टिकून राहील- के बी पाटील, उपसचिव, बाजार समिती

गुळाला मिळणारा दर पाहता उत्पादन खर्चही निघत नाही. त्यात यंदा बाजारपेठेत मागणीही काहीशी घटल्याने मार्केटवर परिणाम दिसत आहे- शरद पाटील, गुऱ्हाळचालक, अर्जुनवाडा

बारमाही गूळ; साठवण थांबली

पूर्वी गुजरात बाजारपेठेत संक्रातीपर्यंत नवीन गुळाची शीतगृहात साठवण केली जायची. पण आता बारमाही गूळ उपलब्ध होतो, त्यात साखर मिश्रित असल्याने टिकाऊपणावर परिणाम झाल्याने साठवण थांबल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :साखर कारखानेऊसकोल्हापूरशेतकरी