Join us

शेतीतल्या लेकींनो! शिळे अन्न खाल्ले तर आरोग्य बिघडणार; व्यायामाकडेही लक्ष देणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 6:57 PM

आरोग्य विभाग : योगा, सूक्ष्म व्यायाम करत आरोग्याची काळजी घ्या.

शेतकरी कुटुंबात अनेक गृहिणी सतत कामात व्यस्त असल्याने त्यांना वारंवार थकवा येणे साहजिकच आहे. तसेच बहुतांशवेळा अनेक शेतकरी कुटुंबात कामाच्या व्यापापुढे दोन वेळेस स्वयंपाक केला जात नाही. म्हणून अनेकजण ताजे अन्न बनविण्याऐवजी उरलेले अन्न खाण्यास प्राधान्य देतात.

मात्र अनेकांना हे माहिती नाही की, शिळे अन्न आपल्या शरीरावर वाईट परिणाम करते. परंतु तरीही कंटाळा करत शिळे अन्न खातात. याचा परिणाम आरोग्यावर होऊन बसतो. बऱ्याचवेळा अनेक कुटुंबातील महिलाच उरलेले शिळे अन्न खातात. कुटुंबातील इतर सदस्यांची प्रकृती खाण्या - पिण्यातून बिघडू नये असा महिलांचा त्यामागील प्रयत्न असतो. मात्र या कुटुंबाच्या काळजीत महिला स्वतःच्या आजाराची काळजी घेत नाहीत. त्यामुळे तर त्या आजारी पडत असतात. सोबत शिळ्या अन्नाचा विपरित परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो.

तसेच शिळा अन्नाचा परिणाम फक्त महिलांच्याच नाही तर अन्न पाषाण केलेल्या इतर सदस्यांच्या आरोग्यावर देखील दिसून येतो. तेव्हा घरातील कोणत्याही सदस्यांनी शिळे अन्न खाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

तणाव कसा घालवाल..?

दररोजच्या धावपळीच्या जीवनातून तसेच विविध कामांतून व ताणतणावातून मुक्त्त होण्यासाठी दररोज सकाळी व सायंकाळी पायी फिरावे. दररोज व्यायाम करावा. आरोग्य कसे चांगले राहील, यासाठी सूक्ष्म व्यायामाकडे लक्ष देत राहावे.

महिलांनी आहारात कशी काळजी घ्यावी..?

शिळे अन्न टाळा : महिलांनी रात्रीच्या जेवणानंतरचे अन्न खाण्याचे टाळावे. दररोज ताजे अन्न खावे. जेणेकरून प्रकृती चांगली राहण्यास मदत होईल.

हे खावे : महिलांनी दररोज हिरव्या पालेभाज्या स्वाव्यात. तसेच मोड फुटलेली कडधान्य खाल्ली पाहिजेत. यातून शरीराला जीवनसत्त्वे मिळतात.

हे खाऊ नका : ऑलिव्ह, जवस तेल आणि कॅनोला तेल या सारख्या थंड दाबलेल्या तेलामध्ये ओमेगा-३ फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ते खाण्याचे टाळावे.

कुटुंबाची काळजी घेत व्यायाम करा

प्रत्येक महिलेने आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. सोबतच स्वतःच्याही आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी दररोज नियमितपणे व्यायाम करावा.

हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी काय कराल..?

हिमग्लोबीन वाढविण्यासाठी आहारात सोयाबीन, कडधान्ये, अंडी, सुकामेवा, हिरव्या पालेभाज्या, गूळ, खारीक, बीट, गाजर नेहमी खात रहावे. तसेच हिमोग्लोबीन उत्तम ठेवण्यासाठी दररोज किमान अर्धातास तरी व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच रोज मॉर्निंग वॉक करणेही आवश्यक आहे. तरच प्रकृती ठणठणीत राहील. - डॉ. यशवंत पवार, हिंगोली

टॅग्स :स्त्रियांचे आरोग्यशेतीशेतकरीमहिला