Lokmat Agro >शेतशिवार > फसल बिमाची नोंदणी २७ टक्क्यांनी वाढली, कसा घ्यावा या योजनेचा लाभ?

फसल बिमाची नोंदणी २७ टक्क्यांनी वाढली, कसा घ्यावा या योजनेचा लाभ?

Fasal Bima registration increased by 27 percent, how to take advantage of this scheme? | फसल बिमाची नोंदणी २७ टक्क्यांनी वाढली, कसा घ्यावा या योजनेचा लाभ?

फसल बिमाची नोंदणी २७ टक्क्यांनी वाढली, कसा घ्यावा या योजनेचा लाभ?

२०२३-२४ या आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत विमा उतरवलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी ४२ टक्के हे बिगर कर्जदार शेतकरी आहेत.

२०२३-२४ या आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत विमा उतरवलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी ४२ टक्के हे बिगर कर्जदार शेतकरी आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेमध्ये मागील आठ वर्षांमध्ये ५६.८० कोटी शेतकऱ्यांनी अर्जाची नोंदणी झाली असून चालू वर्षात या योजनेअंतर्गत नावनोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये २७ टक्के वाढ झाल्याचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने सांगितले.

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेत शेतकरी अर्जांची संख्या वर्षानुवर्षे अनुक्रमे ३३.४ टक्के आणि ४१ टक्के एवढी वाढली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत विमा उतरवलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी ४२ टक्के हे बिगर कर्जदार शेतकरी आहेत.

जागतिक स्तरावरील योजनांमध्ये प्रिमीयमच्या बाबतीत ही तिसरी सर्वात मोठी योजना आहे. २०१६ साली सुरु करण्यात आलेल्या या योजनेत शेतकऱ्यांचे पीक नुकसान किंवा अनपेक्षित घटनांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करते.  या योजनेद्वारे शेतकऱ्यांना केवळ विम्याचा ५० टक्के हप्ता भरावा लागतो. त्याबरोबर केंद्र आणि राज्य सरकारकडून ५० टक्के अनुदान दिले जाते. 

या योजनेचा लाभ कसा घ्यावा?

  • या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर शेतकऱ्याला त्यांच्या जिल्ह्यातील बँक किंवा कृषी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल.
  • अर्जामध्ये शेतकऱ्याला त्याच्या पिकाची माहिती, जमिनीची माहिती आणि विम्याची रक्कम भरावी लागेल.
  • शेतकऱ्याने आपल्या पिकाचे आधारकार्ड, जमिनीचा पट्टा, व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जमा करावीत.
  • अर्ज स्विकारल्यानंतर शेतकऱ्याला विम्याचा हप्ता भरावा लागेल.
  • विम्याचा हप्ता भरल्यानंतर शेतकऱ्याला विमा पॉलिसी मिळेल.

Web Title: Fasal Bima registration increased by 27 percent, how to take advantage of this scheme?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.