Lokmat Agro >शेतशिवार > Fertilizer Production : शेतकऱ्यांसाठी महापालिका करतेय खतनिर्मिती; नमुने कृषी विद्यापीठाकडे पाठवले वाचा सविस्तर

Fertilizer Production : शेतकऱ्यांसाठी महापालिका करतेय खतनिर्मिती; नमुने कृषी विद्यापीठाकडे पाठवले वाचा सविस्तर

Fertilizer Production: Municipal Corporation is producing fertilizer for farmers; Samples sent to Agricultural University read in details | Fertilizer Production : शेतकऱ्यांसाठी महापालिका करतेय खतनिर्मिती; नमुने कृषी विद्यापीठाकडे पाठवले वाचा सविस्तर

Fertilizer Production : शेतकऱ्यांसाठी महापालिका करतेय खतनिर्मिती; नमुने कृषी विद्यापीठाकडे पाठवले वाचा सविस्तर

Fertilizer Production : जालना मनपाच्या वतीने (Jalna Municipal Corporation) सामनगाव येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात दैनंदिन जवळपास ५० ते ७५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खताची निर्मिती (Fertilizer Production) केली जात आहे. वाचा सविस्तर

Fertilizer Production : जालना मनपाच्या वतीने (Jalna Municipal Corporation) सामनगाव येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात दैनंदिन जवळपास ५० ते ७५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खताची निर्मिती (Fertilizer Production) केली जात आहे. वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Fertilizer Production : जालना मनपाच्या वतीने (Jalna Municipal Corporation) सामनगाव येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात दैनंदिन जवळपास ५० ते ७५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खताची निर्मिती (Fertilizer Production) केली जात आहे.

तयार झालेल्या खताचे नमुने राहुरी येथील कृषी विद्यापीठाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कृषी विद्यापीठाकडून हिरवा कंदील येताच ५० किलोच्या गोणीद्वारे ते खत शेतकऱ्यांना (farmers) विक्री केले जाणार आहे.  (Fertilizer Production)

उद्योगनगरी जालना शहरात दैनंदिन जवळपास ११५ ते १२० टन कचऱ्याचे संकलन होते. शहरातील कचरा संकलनासाठी ५० घंटागाड्या, सहा ई-घंटागाड्या, सहा टिप्पर कार्यरत आहेत. शिवाय महापालिकेचे ३५७ कर्मचारी आणि १४० कंत्राटी कर्मचारी हे शहर स्वच्छतेचे काम करतात.

शहरात संकलित होणाऱ्या कचऱ्यावर सामनगाव येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात प्रक्रिया करून खताची निर्मिती केली जात आहे. जानेवारी महिन्यापासून या प्रकल्पात खत तयार केला जात आहे. (Fertilizer Production)

दैनंदिन ५० ते ७५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करून या खताची निर्मिती (Fertilizer Production) केली जात आहे. सध्या महापालिकेने कर्मचारी तेथे नियुक्त केले असून, एका शिफ्टमध्ये हे काम केले जात आहे.

महापालिकेने तयार केलेल्या खताचे नमुने हे राहुरी येथील कृषी विद्यापीठाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. नमुन्यांचा अहवाल सकारात्मक येताच महानगरपालिका शेतकऱ्यांना खताची विक्री करणार आहे. (Fertilizer Production)

३५७ कर्मचारी आणि १४० कंत्राटी कर्मचारी महानगरपालिकेमध्ये शहर स्वच्छतेची कामे करतात. संकलित होणाऱ्या कचऱ्यावर सामनगाव येथे प्रक्रिया होते.

ओला अन् सुका कचरा वेगवेगळा हवा

खताची निर्मिती करण्यासाठी ओला आणि सुका कचरा हा वेगवेगळा येणे अपेक्षित आहे. शहरवासीयांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा द्यावा.
यासाठी मनपाकडून जनजागृतीही केली जात आहे. शिवाय मिश्र कचरा देणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे.

सामनगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्रात खताची निर्मिती केली जात आहे. तयार केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. तेथून सकारात्मक अहवाल आल्यानंतर खताची विक्री शेतकऱ्यांना केली जाणार आहे. - संतोष खांडेकर, आयुक्त, मनपा, जालना

शासनाचा हरित ब्रँड

* महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींकडून निर्मिती होणारे खत हे शासनाच्या हरित ब्रँडअंतर्गत विकले जाते.

* राहुरी कृषी विद्यापीठाकडून मान्यता मिळाल्यानंतर शासनाच्या हरित ब्रँड नुसार खताची विक्री केली जाणार आहे.

...तर पाच रुपये किलोने विक्री

* संगमनेर महापालिका खताची निर्मिती करीत असून, पाच रुपये किलोप्रमाणे ५० किलोची एक गोणी विक्री केली जात आहे.

* जालना मनपाने तयार केलेल्या खताला विक्रीसाठी हिरवा कंदील मिळाला तर पाच रुपये किलोने खताची विक्री शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा सविस्तर : Tapi Water Recharge: महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना 'महाकाय जलपुनर्भरण प्रकल्पा'चा होणार लाभ!

Web Title: Fertilizer Production: Municipal Corporation is producing fertilizer for farmers; Samples sent to Agricultural University read in details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.