Join us

ऐन खरीप पेरण्यांच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा आहे का?

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 30, 2024 3:26 PM

युरीया, डीएपीासह किती संयुक्त खते राहिली शिल्लक? मागणी किती? प्रशासनाने केले जाहीर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खरीप हंगामाची पूर्वमशागत अंतीम टप्प्यात असून आता पेरण्यांसाठी बियाणे, खतांची तजवीज करण्यात शेतकरी गुंतला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आता एकूण २ लाख ८८ हजार ७०० टन खतांच्या वितरणाला मंजूरी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील लागवडीखालील सरासरी क्षेत्र ६.८४ लाख हेक्टर आहे.एकूण बागायती क्षेत्र २.०६ लाख एवढे आहे. यासाठी मे महिन्यात ३८ हजार १२४ टन खतांचा पुरवठा करण्यात येणार आहे. युरीया, डीएपी, एमओपी, एकूण संयुक्त खते आणि एसएसपी या खतांचे आवंटन करण्यात येणार आहे. तर जुन महिन्यात ७५०५३ मे.टन खतांचा पुरवठा होणार असल्याचे खरीपपूर्व आढावा बैठकीत सांगण्यात आले.

आता किती खते शिल्लक?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह ८ तालुक्यांमध्ये २४ मे नंतर एकूण १ लाख ४३ हजार ८२० मे. टन खतांचा साठा शिल्लक राहिला असल्याचे प्रशासनाने जाहीर केले.

खतमागणीशिल्लक
युरिया12876462986
डीएपी325077473
एमओपी298562416
संयुक्त खते291002570

 

टॅग्स :खतेऔरंगाबादशेतीखरीप