केंद्र सरकारने नुकतीच पीएम सूर्य घर योजनेला सुरुवात केली होती. त्यातच अवघ्या काही महिन्यातच या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी १.२८ कोटींपेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झाले असून १४ लाख अर्ज आलेले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात १४ लाख घरांवर सोलर रुफ टॉप बसवण्यात येणार आहे.
या योजनेतंर्गत एकूण खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली आहे. पीएम सूर्य घर योजनेत १ कोटी घरांना मोफत सोलर बसविण्याची सुरुवात झाली आहे.
देशातील सर्वच राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुफटॉप योजना (Rooftop Scheme) सुरु झाली आहे. योजनेतंर्गत एकूण खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली आहे. पीएम सूर्य घर योजनेत एक कोटी घरांना मोफत सोलर बसविण्याची सुरुवात झाली आहे.
काय आहे योजना?
पीएम सूर्य घर योजनेतील लाभार्थ्यांनाच ३०० युनिट मोफत वीज मिळेल. इतर योजनांप्रमाणेच या योजनेत सबसिडी मिळेल. वीजचे उत्पादन आणि खर्चाच बजेट इत्यादी माहिती पण मिळेल.
योजना आहे यांच्या देखरेखेखाली
पीएसयू या योजनेवर एनटीपीसी, एनएचपीसी, पीएफसी, पावर ग्रिड, नीपको, एसजीवीएन, टीएचडीसी आणि ग्रिड इंडिया देखरेख ठेवतील.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी
https://pmsuryaghar.org.in या संकेतस्थळावर जाऊन योजनेसाठी अर्ज करता येतो.
२ किलोवॉट सोलर रुफ टॉप
जर छतावर २ किलोवॉट सोलर रुफटॉप बसवू इच्छित असाल तर त्यासाठी ४७ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकार या खर्चावर तुम्हाला १८ हजार रुपयांची सबसिडी देईल. देशातील अनेक राज्यांनी पण केंद्रा इतकीच सबसिडी देण्याची घोषण केली आहे. त्यामुळे ३६ हजार रुपयांची सबसिडी मिळते. उर्वरीत रक्कम तुमच्या जवळ नसेल तर बँकेकडून कर्ज उपलब्ध होईल.
ऊर्जा मंत्रालयाने निर्देश केल्यानुसार १३० चौरसफुट जागेवर सोलर रुफटॉप प्लँट दररोज ४.३२ किलोवॅट वीज तयार करेल. त्याचा वार्षिक हिशेब लावल्यास जवळपास १५७६.८ किलोवॅट प्रत्येक वर्षी वीज उत्पादन होईल. त्यामुळे प्रति दिवशी जवळपास १३ रुपयांची बचत होईल आणि वार्षिक ५ हजार रुपयांची बचत होणार आहे.
४ किलोवॉट सोलर रुफ टॉप
जर तुम्ही ४ किलोवॉट चे रुफटॉप बसवू इच्छित असाल तर तुम्हाला २०० चौरसफूट जमीन लागेल. रुफटॉप सोलर प्लँट लावल्यावर ८६ हजार रुपये खर्च येईल. यामध्ये केंद्र सरकार ३६ हजार रुपये सबसिडी देईल. तुम्हाला ५० हजार रुपये आपल्या जवळचे खर्च करावे लागतील. तुम्ही राज्य सरकारच्या सबसिडीचा फायदा घेऊ शकता. त्यामुळे प्रत्येक दिवशी ८.६४ किलोवॅट वीज उत्पादन होईल. वार्षिक ९,४६० रुपयांची बचत होईल.
कोण आहेत लाभार्थी
पीएम सूर्य घर योजनेचा लाभ हा केवळ गरीब आणि मध्यमवर्गातील कुटुंबांनाच असून याच कुटुंबांना योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे.