सरकारने खासगी नोकरदार वर्गाला गुड न्यूज दिली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा रकमेवर (ईपीएफ) ८.२५ दराने व्याज मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
याची शिफारस सरकारकडे करण्यात आली आहे. सरकारने त्यास मंजुरी दिल्यानंतर व्याजदर लागू होईल. गेल्या वर्षी दिलेल्या व्याजदरात यावेळी ०.१० टक्के वाढ करण्यात आली आहे. याचा मोठा फायदा खासगी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
■ ८ कोटींपेक्षा जास्त सदस्य ईपीएफओचे आहेत.■ १ लाख खात्यात जमा असल्यास ८,२५० रुपये व्याज मिळेल. अर्थमंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर ३१ मार्चपर्यंत व्याज ईपीएफ खात्यात जमा केले जाते.■ ८.१५% दराने गेल्या वर्षी व्याज दिले होते.■ १२ % मूळ वेतनातील रक्कम पीएफ खात्यात जमा होते. कंपनीच्या योगदानातून ३.६७ टक्के पीएफ खात्यात तर ८.३३ टक्के रक्कम पेन्शन योजनेत जाते.
किती रकमेवर किती मिळेल व्याज?
रक्कम (र.) | १ लाख | ३ लाख | ५ लाख | १० लाख |
जुन्या दराने | ८,१५० | २४,४५० | ४०,७५० | ८१,५०० |
नव्या दराने | ८,२५० | २४,७५० | ४१,२५० | ८२,५०० |
जमा रक्कम अशी तपासाईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या युएएन क्रमांकाद्वारे खात्यात लॉगिन करा. तेथे ई-पासबुकचा पर्याय दिसेल. तो निवडल्यानंतर जमा रक्कम दिसेल. पीएफ खात्याशी जो मोबाइल क्रमांक जोडलेला आहे, त्यावरून ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. काही वेळातच पीएफ खात्याची माहिती एसएमएसवर प्राप्त होईल.