कोल्हापूर : आंदोलन अंकुश संघटनेच्या पुढाकारातून शेतकऱ्यांच्या पैशांतून शिरोळ येथे महाराष्ट्रातील पहिला वजनकाटा उभा केला असून या काट्याची धास्ती साखर कारखानदारांनी घेतली आहे.
त्यामुळे या परिसरातील कारखान्यांनी वजनकाटे अचूक ठेवल्याने हंगामात शेतकऱ्यांचा किमान ७७ कोटींची लूट वाचल्याचा दावा संघटनेचे नेते धनाजी चुडमुंगे यांनी केला आहे.
काटामारी रोखण्यासाठी 'आंदोलन अंकुश'ने काटा उभारण्याचा निर्णय घेतला नृसिंहवाडी येथील रामचंद्र गेंडे यांनी स्वतःची जमीन दिली तर शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन ३३ लाखांचा वजनकाटा उभारला.
या काट्यामुळे भागातील दत्त, गुरुदत्त, जवाहर, शरद, पंचगंगा व सांगलीतील दत्त इंडिया या साखर कारखान्यांचे एकूण गाळप हे ५० लाख टनापेक्षा जास्त झाले आहे. यात कित्येक टन उसाची काटामारी व्हायची.
मात्र, येथे काटा बसवल्यानंतर सगळ्याच कारखान्यांनी काटे अचूक करुन घेतले. जिल्ह्यात प्रत्येक विभागात शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन असे काटे उभारले तर कोट्यावधी रुपये वाचतील, असा विश्वासही चुडमुंगे यांनी व्यक्त केला. यावेळी तालुकाध्यक्ष दीपक पाटील, दत्तात्रय जगदाळे, भूषण गंगावणे उपस्थित आहे.
'इंडिकेटर'वरूनच थेट वजन पावती द्यावीसर्वच कारखान्यांचे वजनकाटे डिजीटल आहेत. मात्र, ऑनलाईन नसल्याने वजनात फेरफार करता येते. यासाठी शासनाने सर्व्हरच्या नियंत्रणाखाली काटे आणले तर छेडछाड निदर्शनास येते. इंडिकेटर वरुनच थेट वजन पावती द्यावी, अशी मागणी चुडमुंगे यांनी केली.
हंगामात २६०० ऊस वाहनांचे मोफत वजनहंगामात या काट्यावर २६०० ऊस वाहनांचे मोफत वजन करुन दिले. त्यामध्ये, सीमाभागातील काही कारखान्यांच्या वजनात तफावत आढळली.
इंडिकेटरला संगणक जोडणे घातकइंडिकेटरला संगणक जोडून पावती देऊ नये, असा आदेश नियंत्रक वैध मापन शास्त्र विभागाचे डॉ. रवींद्र सिंगल यांनी नोव्हेंबर २०२२ ला काढले. हा आदेश कारखान्यांना अडचणीचा असल्याने त्यांची बदली झाली आणि डॉ. सुरेश मेकला यांनी ही अटच रद्द केली. ही घातक असल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले.
अधिक वाचा: Sugarcane Disease उत्तर प्रदेशात ऊस उत्पादकांमध्ये या रोगाची दहशत